MI vs KKR : Ryan Rickelton ची अर्धशतकी खेळी, मुंबई इंडियन्सची केकेआरवर 8 विकेट्सने मात, पलटणचा घरच्या मैदानात धमाकेदार विजय
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Match Result : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलच्या 18 व्या मोसमातील विजयाचं खातं उघडलं आहे. मुंबईने केकेआरवर एकतर्फी विजय मिळवला आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात सलग 2 पराभवानंतर अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये 8 विकेट्सने हा धमाकेदार विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईनला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 12.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 121 धावा केल्या. मुंबईचा हा वानखेडे स्टेडियममधील केकेआरविरुद्धचा 10 वा विजय ठरला. मुंबईसाठी रायन रिकेल्टन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रायनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर सूर्युकमार यादव, विल जॅक्स आणि रोहित शर्मा या तिघांनाही धावा केल्या आणि विजयात योगदान दिलं.
मुंबईची बॅटिंग
रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या दोघांनी 46 धावांची सलामी भागीदारी केली. रोहित शर्मा 13 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर रायन आणि विल जॅक्स या दोघांनी दुसर्या विकेटसाठी 45 रन्स जोडल्या. त्यानंतर विल 16 रन्स करुन माघारी परतला. यानंतर रायन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने मुंबईला विजयापर्यंत नेलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 30 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. रायन रिकेल्टन याने 41 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 62 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 2 सिक्स आणि 3 फोरसह 9 बॉलमध्ये नॉट आऊट 27 रन्स केल्या. सूर्याने केलेल्या या स्फोटक खेळीमुळे मुंबईला 43 चेंडू राखून विजय मिळवण्यात यश आलं.
डेब्युटंट अश्वनी कुमारचा धमाका
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या गोलंदाजांनी धमाका केला आणि कॅप्टन हार्दिकचा निर्णय योग्य ठरवला. मुंबईने केकेआरला 16.2 ओव्हरमध्ये 116 रन्सवर ऑलआऊट केलं. यामध्ये डेब्यूटंट अश्वनी कुमार याने निर्णायक भूमिका बजावली. अश्वनीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. अश्वनीला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
मुंबईचा 8 विकेट्सने धमाकेदार विजय
Absolute dominance from start to end. 😎💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvKKR pic.twitter.com/urh6n7opu4
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2025
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन, विल जॅक्स (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथूर.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.