Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB : रोहितच्या घरात विराटच्या आरसीबीचा 2015 नंतर पहिला विजय, मुंबईवर 12 धावांनी मात, पलटण पुन्हा अपयशी

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Match Result Ipl 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 222 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

MI vs RCB : रोहितच्या घरात विराटच्या आरसीबीचा 2015 नंतर पहिला विजय, मुंबईवर 12 धावांनी मात, पलटण पुन्हा अपयशी
RCB Virat Kohli Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 07, 2025 | 11:50 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bengaluru) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 20 व्या सामन्यात 12 धावांनी मात केली आहे. आरसीबीने मुंबईला विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 9 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 209 धावाच करता आल्या. आरसीबीने यासह 10 वर्षांची प्रतिक्षा संपवली. आरसीबीने वानखेडे स्टेडियममध्ये 2015 नंतर पहिल्यांदा विजय मिळवला. तर आरसीबीचा हा या मोसमातील तिसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा घरच्या मैदानातील पहिला आणि एकूण चौथा पराभव ठरला.

मुंबईच्या टॉप ऑर्डरला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यानंतरही त्यापैकी एकालाही त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलता आलं नाही. मात्र मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे मुंबई शेवटच्या ओव्हरपर्यंत कायम राहिली. कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या दोघांनी फटकेबाजी केली. त्यामुळे मुंबई जिंकेल, असं वाटत होतं. मात्र हे दोघे निर्णायक क्षणी आऊट झाले. त्यामुळे मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आणि शेवटी पलटण पराभूत झाली.

मुंबईची बॅटिंग

रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने प्रत्येकी 17-17 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. विल जॅक्स याने 22 धावा केल्या. लोकल बॉय सूर्यकुमार यादव याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. सूर्याने त्यानुसार बॅटिंगही केली. मात्र सूर्याने निराशा केली. सूर्या 26 चेंडूत 5 चौकारांसह 28 धावा करुन बाद झाला. त्यामुळे मुंबईची स्थिती 4 बाद 99 अशी झाली.

हार्दिक- तिलकची भागीदारी

त्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तिलक वर्मा मोक्याच्या क्षणी आऊट झाला. तिलकने 29 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. तिलक नंतर हार्दिक पंड्या हा देखील आऊट झाला. त्यामुळे सामना आरसीबीच्या बाजूने झुकला. हार्दिकने 15 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह 42 रन्स केल्या. त्यानंतर इतरांनी मुंबईच्या विजयासाठी प्रयत्न केले. मात्र तसं होऊ शकलं नाही. नमन धीर याने 11 आणि मिचेल सँटनर याने 8 धावा केल्या. दीपक चाहर आणि याला भोपळाही फोडता आला नाही. तर ट्रेन्ट बोल्ट 1 धावेवर नाबाद राहिला. आरसीबीकडून कृणाल पंड्या याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. यश दयाल आमि जोश हेझलवूड या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.