Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC : करुण नायरची खेळी व्यर्थ, मुंबई इंडियन्सने दिल्लीला पराभूत करून केलं कमबॅक

आयपीएल 2025 स्पर्धेतील 29वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने करुण नायरच्या इम्पॅक्टफूल कामगिरीने जर तर वर आला होता. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेलं 206 धावांचं आव्हान सहज गाठेल असं वाटत होतं. पण मुंबईने हा सामना 12 धावांनी जिंकला.

MI vs DC : करुण नायरची खेळी व्यर्थ, मुंबई इंडियन्सने दिल्लीला पराभूत करून केलं कमबॅक
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 13, 2025 | 11:32 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतही मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका खंडीत झाली  आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं होतं. पण दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आली आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 205 धावा केल्या आणि विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना पहिल्याच चेंडूवर दिल्लीची पहिली विकेट पडली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स बॅकफूटवर गेली होती. पण तसं काही झालं नाही. दिल्लीने करूण नायरच्या रुपाने इम्पॅक्ट कार्ड काढलं. करूण नायरचा फॉर्म काय आहे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वांनी अनुभवलं होतं. त्याची प्रचिती या सामन्यातही आली. करुण नायरने जो गोलंदाज समोर येईल त्याला फोडला. जसप्रीत बुमराहची देखील खैर केली नाही. त्याने फक्त 22 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतरही त्याचा खेळ सुरुच होता. नायरच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची स्थिती करूण झाली होती. करुण नायरने 40 चेंडूत 89 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या. त्यामुळे सोपा वाटणारा विजय पराभवात रुपांतरीत झाला.

दिल्ली कॅपिटल्सने या स्पर्धेतील पहिला पराभव पाहिला आहे आहे. पराभव झाल्याने दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी घसरला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे या स्पर्धेत अजून 9 सामने खेळायचे आहेत. यापैकी फक्त चार सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे.  दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचं या स्पर्धेतील आव्हान अजून किचकट झालं आहे. सहा पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे उर्वरित 8 पैकी सहा सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. नाही तर स्पर्धेतील आव्हान जर तरवर येईल. इतकंच काय तर संपुष्टातही येऊ शकतं. या सामन्यातील विजयासह सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.