गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 बदलणार, दोन खेळाडूंचं स्थान संकटात
आयपीएल 2025 स्पर्धेला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला सामना गमावला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सपुढे कमबॅकचं आव्हान आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेतही मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने 4 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 155 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 19.1 षटकात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सने 2012 मध्ये शेवटचा पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर आतापर्यंत पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मात्र हा पराभव विसरून मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या सामन्याच्या तयारीला लागला आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघात बदल होणार हे निश्चित आहे. कारण मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्याचं कमबॅक होणार आहे. हार्दिक पांड्यावर पहिल्या सामन्यात बंदी होती त्यामुळे खेळला नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात कमबॅक होणार असल्याने प्लेइंग 11 मध्ये बदल होणार हे निश्चित आहे. यामुळे मागच्या प्लेइंग 11 मधील दोन खेळाडूंवर टांगती तलवार आहे.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर रॉबिन मिंज उतरला होता. त्याने 9 चेंडूंचा सामना केला आणि 3 धावा केल्या होत्या. तर सातव्या क्रमांकावर नमन धीर उतरला होता आणि त्याने 12 चेंडूत 17 धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्याचं कमबॅक होणार असल्याने या दोघांपैकी एकाची विकेट पडणार हे निश्चित आहे. कारण हार्दिक पांड्या हा सहाव्या किंवा सातव्या स्थानावर फलंदाजी करतो. त्यामुळे या व्यतिरिक्त संघात फार काही बदल होईल असं वाटत नाही.
मुंबई इंडियन्सचा दुसरा गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना 29 मार्चला होणार आहे. हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल हे दोन कर्णधार आमनेसामने असतील. 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने विजय मिळवला होता. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला आता विजयाच्या रुळावर उतरणं गरजेचं आहे.
मुंबई इंडियन्सची अशी असू शकते प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटीकीर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर/रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू.