
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. आरसीबीचा हा या मोसमातील पाचवा आणि दिल्लीचा चौथा सामना असणार आहे. आरसीबीने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर एकमेव सामना गमावला आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्सला या हंगामात आतापर्यंत एकही संघ पराभूत करु शकलेला नाही. दिल्लीने खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीसमोर घरच्या मैदानात दिल्लीची घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना गुरुवारी 10 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स मॅच मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवरुन पाहता येईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.
दिल्ली कॅपिटल्स संघ : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, करुण नायर, मोहित शर्मा, दुष्मंथा चमीरा, अजय जाधव मंडल, दर्शन नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, विपराज निगम आणि माधव तिवारी.