RCB vs GT : माजी संघासमोर ‘मियाँ मॅजिक’, मोहम्मद सिराजकडून तिघांचं पॅकअप, गुजरातसाठी ठरला POTM
RCB vs GT Mohammed Siraj : मोहम्मद सिराजने आरसीबीचं एकूण 7 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मात्र याच माजी संघाविरुद्ध खेळताना सिराजने 3 विकेट्स घेत गुजरातसाठी निर्णायक भूमिका बजावली.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा घरच्या मैदानात धुव्वा उडवला आहे. गुजरातने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला. आरसीबीने गुजरातला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान 17.5 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. जोस बटलर आणि साई सुदर्शन या जोडीने गुजरातच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मोहम्मद सिराज यानेही माजी संघाविरुद्ध मियाँ मॅजिक दाखवली. सिराजने केलेल्या कामगिरीसाठी त्याचा खास गौरव करण्यात आला.
जोस बटलर याने विजयी धावांचा पाठलाग करताना नाबाद 73 धावांची खेळी. तर साई सुदर्शन याने 49 धावांचं योगदान दिलं. तर त्याआधी मोहम्मद सिराज याने आपल्या माजी संघाविरुद्ध 3 विकेट्स घेत गुजरातला 169 धावांवर रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली. सिराजला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
‘डीएसपी’ मोहम्मद सिराज याने 4 ओव्हरमध्ये 4.80 च्या इकॉनॉमी रेटने 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. सिराजने फिल सॉल्ट, देवदत्त पडीक्कल आणि लियाम लिविंगस्टोन या प्रमुख फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सिराजने 3 पैकी दोघांच्या दांड्या गुल केल्या. सिराजने फिल सॉल्ट आणि पडीक्कल या दोघांना बोल्ड केलं.
आरसीबीचं 7 वर्ष प्रतिनिधित्व
दरम्यान मोहम्मद सिराज याने आरसीबीचं गेली 7 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मात्र आरसीबीने सिराजला मेगा ऑक्शनआधी करारमुक्त केलं. सिराजने आरसीबीसाठी 7 वर्षांत एकूण 87 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
मोहम्मद सिराज ‘मॅन ऑफ द मॅच’
𝐸𝑓𝑓𝑒𝑐𝑡𝑖𝑣𝑒 & 𝑜𝑛 𝑝𝑜𝑖𝑛𝑡 🎯 pic.twitter.com/AJeRGcesTv
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 2, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.