Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माईंडगेम..! कोलकात्याच्या महागड्या खेळाडूसाठी कृणाल पांड्याने असं रचली व्यूहरचना, झालं असं की…

आयपीएल मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक पैसै मोजून वेंकटेश अय्यरला आपल्या संघात घेतलं. खरं तर त्याला रिलीज केलं होतं. पण असं असूनही लिलावात त्याच्यासाठी 23.75 कोटींची रक्कम मोजली. पण इतकी रक्कम मोजलेला खेळाडू कृणाल पांड्यात जाळ्यात फसला.

माईंडगेम..! कोलकात्याच्या महागड्या खेळाडूसाठी कृणाल पांड्याने असं रचली व्यूहरचना, झालं असं की...
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 22, 2025 | 10:35 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बरंच काही घडलं. आयपीएल लिलावातील तिसरा महागडा खेळाडू असलेला वेंकटेश अय्यर काय करतो? याकडे लक्ष लागून होतं. पण पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. बाद झाल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. डीकॉक स्वस्तात बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नरीनने डाव सावरला. ही जोडी फुटल्यानंतर खर तर वेंकटेश अय्यरकडून मधल्या फळीत फार अपेक्षा होत्या. कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेची विकेट काढल्यानंतर दबाव वाढला होता. पण वेंकटेश अय्यर या संकटातून बाहेर काढेल अशी अपेक्षा होती. पण कृणाल पांड्याने असा माईंड गेम खेळला की पॅव्हेलियनमधून हेल्मेट मागवावं लागलं आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट पडली.

कृणाल पांड्या वैयक्तिक तिसरं आणि संघाचं 13वं षटक टाकण्यासाठी आला. समोर वेंकटेश अय्यर हेल्मेट न घालता उभा होता. पांड्याने पहिलाच चेंडू बाउंसर टाकला. हा चेंडू पाहून वेंकटेशला हेल्मेटची आठवण आली. पंचांनी त्याला इशारा दिला आणि हेल्मेट घालण्याची सूचना केली. त्यानंतर कृणाल पांड्याने फुलर चेंडू टाकला आणि त्याचा त्रिफळा उडवला. वेंकटेश अय्यर 7 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 6 धावा करून बाद झाला. वेंकटेश अय्यर त्यांच्या 23.75 कोटी रुपयांच्या किंमतीचे समर्थन करण्यात अपयशी ठरला.

आरसीबीकडून कृणाल पांड्याने जबरदस्त कामगिरी केली. संघाला कमबॅक करून देण्यात मोलाची साथ दिली. पॉवर प्लेमध्ये टाकलेल्या पहिल्या षटकात 15 धावा दिल्या होत्या. यात दोन चौकार आणि एक षटकार पडला होता. मात्र त्यानंतरच्या 3 षटकात फक्त 14 धावा देत 3 गडी बाद केले. त्याने 4 षटकात 29 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे आरसीबीने केकेआरला 174 धावांवर रोखलं.

शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.