RCB vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सने सामना कुठे गमावला? कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला…
आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयाने सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव केला. तसेच नेट रनरेटही चांगलाच कमावला आहे. असं असताना या पराभवामुळे कोलकात्याला फटका बसला आहे. या पराभवाबाबत अजिंक्य रहाणेने आपलं मत मांडलं आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना पार पडला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकात 174 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी दिलेलं 175 धावांचं आव्हान 16.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयानंतर आरसीबीला 2 गुणांसह नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. आरसीबीचा नेट रनरेट हा +2.137 इतका आहे. खरं तर या सामन्यात क्विंटन डीकॉकची विकेट गेल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नरीन यांनी दाणादाण उडवून दिली होती. दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली होती. मात्र नंतर सर्वच चित्र उलटं झालं. मधल्या फळीत धडाधड विकेट पडल्या. त्यामुळे 200 धावांचं लक्ष्य गाठणं काही शक्य झालं नाही. खरं तर 200 धावांचं लक्ष्य दिलं असतं तर ते आरसीबीला कठीण गेलं असतं. त्याचबरोबर धावांचं प्रेशर असतं ते वेगळं.. पण तसं काही झालं नाही. या पराभवाचं कारण कर्णधार अजिंक्य रहाणे याने सांगितलं.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाली की, ‘मला वाटलं होतं की 13व्या षटकापर्यंत आम्ही चांगले खेळलो. पण 2-3 विकेट्सनी सामन्याच चित्र बदललं. फलंदाजांनी सर्वोत्तम प्रयत्न केले पण त्यांना यश मिळालं नाही. मी आणि वेंकी फलंदाजी करत असताना आम्ही चर्चा करत होतो की २००-२१० धावा साध्य करता येतील. पण त्या विकेट्समुळे धावगती मंदावली. थोडे दव पडले होते. पण त्यांचा फलंदाजांनी खूप चांगला पॉवरप्ले खेळला. आम्ही २००+ धावा करण्याच्या विचारात होता. आम्हाला या सामन्याबद्दल जास्त विचार करायचा नाही पण त्याच वेळी काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल