सध्या टीम इंडिया मायदेशात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया पुढील काही महिन्यांमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचं पुढील काही महिन्यातील शेड्यूल फुल्ल आहे. अशात आयपीएलच्या 18 व्या मोसमाचेही क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत. या 18 व्या हंगामाला अद्याप अनेक महिने बाकी आहेत. मात्र या हंगामाआधी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. त्या मेगा ऑक्शनआधी प्रत्येक फ्रँचायजी किती खेळाडू के संघात कायम अर्थात रिटेन करु शकते? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी बीसीसीआय प्रत्येक संघाला 5 खेळाडू कायम राखण्याची परवानगी देऊ शकते. नुकतंच बीसीसीआय सचिव जय शाह आणि आयपीएल स्पर्धेतील 10 फ्रँचायजींसह बैठक पार पडली. या बैठकीत या फ्रँचायजीच्या मालकांनी 5-6 खेळाडू रिटेन करण्याबाबत सहमती दर्शवली. 5 खेळाडू रिटेन केल्यास टीमची ब्रँड वॅल्यू कायम राहिल, असा विश्वासही फ्रँचायजीच्या मालकांनी या बैठकीत व्यक्त केला होता.
बीसीसीआयने आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी अर्थात 2022 च्या ऑक्शनआधी 4 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र आता 2025 आधी प्रत्येक टीम संघात किती विदेशी खेळाडू कायम ठेवू शकते? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
आता बीसीसीआयने 5 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा सर्वात मोठा दिलासा असेल. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबई आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारी पहिली टीम आहे. बीसीसीआयने 5 खेळाडू रिटेन करण्याची संधी दिल्यास मुंबई रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या चौघांना सहज रिटेन करु शकते.
5 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी!
IPL RETENTION UPDATES….!!!!
– BCCI is likely to allow 5 Retentions with no RTM option. [Devendra Pandey From Express Sports] pic.twitter.com/BqV6jpPgBH
— Johns. (@CricCrazyJohns) September 25, 2024
मुंबईने 2022 मध्ये 4 खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड या चौघांना कायम राखलं होतं. त्यामुळे या चौघांना अनुक्रमे 16, 12, आणि 6 कोटी रुपये मिळाले होते. पोलार्ड आयपीएलमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स यंदा या 3 खेळाडूंना रिटेन केल्यानंतर किती रक्कम मिळते? याकडे पलटणचं लक्ष असणार आहे.