Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs KKR : क्विंटनची धमाकेदार खेळी, केकेआरचा 8 विकेट्सने कडक विजय, राजस्थानचा सलग दुसरा पराभव

Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders Match Result : क्विंटन डी कॉक याने गुवाहाटीत धमाकेदार खेळी करत केकेआरला या मोसमातील पहिलावहिला विजय मिळवून दिला आहे. केकेआरने राजस्थानचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून दिला.

RR vs KKR : क्विंटनची धमाकेदार खेळी, केकेआरचा 8 विकेट्सने कडक विजय, राजस्थानचा सलग दुसरा पराभव
Duruv Jurel and Quinton De Kock Ipl 2025 RR vs KKRImage Credit source: IPL X Account
Follow us
| Updated on: Mar 26, 2025 | 11:27 PM

क्विंटन डी कॉक याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमात पहिला विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सने कोलकाताला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने हे आव्हान क्विंटन डी कॉक याच्या नाबाद 97 धावांच्या जोरावर 15 बॉलआधी पूर्ण केलं. केकेआरने 17.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 153 रन्स केल्या. केकेआरला यासह पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात विजयाची चव चाखण्यात यश आलं. तर राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

केकेआरची बॅटिंग

मोईन अली आणि क्विंटन डी कॉक या सलामी जोडीने केकेआरला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 41 धावा केल्या. मात्र त्यानंतर मोईन सातव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 5 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कॅप्टन रहाणे मैदानात आला. रहाणेने क्विंटनसह दुसर्‍या विकेटसाठी 29 धावा जोडल्या. रहाणे 15 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 18 रन्स करुन माघारी परतला. रहाणे आऊट झाल्यानंतर केकेआरचा स्कोअर 10.1 ओव्हरमध्ये 2 आऊट 70 असा झाला.

त्यानंतर मुंबईच्या अंगकृष रघुवंशी याने क्विंटन डी कॉकला या अप्रतिम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची नाबाद आणि विजयी भागीदारी केली. अंगकृष रघुवंशी याने 17 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 22 धावांची खेळी केली. तर क्विंटनने 64 चेंडूत 159.02 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 97 धावा केल्या. क्विंटनने यादरम्यान 6 षटकार आणि 8 चौकार झळकावले. क्विंटनचं हे केकेआरसाठी पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. तर राजस्थानसाठी वानिंदु हसरंगा याने एकमेव विकेट घेतली.

 केकेआरचा कडक विजय, राजस्थानचा 8 विकेट्सने धुव्वा

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.