RR vs KKR : केकेआरसमोर 152 धावांचं आव्हान, राजस्थान रोखणार की कोलकाता जिंकणार?
Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders 1st Innings Highlights : केकेआरच्या गोलंदाजांनी राजस्थानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. मात्र त्यानंतरही राजस्थानने 150 पार मजल मारली आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. कोलकाताचे गोलंदाज राजस्थानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. राजस्थानच्या गोटात यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर यासारखे तगडे फलंदाज असूनही राजस्थानला जेमतेम 150 पार मजल मारता आली. दोन्ही संघांचा हा मोसमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांची पराभवाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता केकेआरला पहिला विजय मिळवायचा असेल तर 152 धावा कराव्या लागणार आहेत. आता केकेआर विजयी आव्हान पूर्ण करते की राजस्थान विजयाचं खातं उघडते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
राजस्थानची बॅटिंग
राजस्थानसाठी ध्रुव जुरेल याने सर्वाधिक धावा केल्या. जुरेलने 28 बॉलमध्ये 33 रन्स केल्या. यशस्वी जयस्वाल याने 24 चेंडूत 29 धावा केल्या. कर्णधार रियान परागने 15 चेंडूत 25 धावांचं योगदान दिलं. जोफ्रा आर्चरने 16 रन्स केल्या. तर संजू सॅमसन याने 13 रन्स जोडल्या. या 5 जणांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
नितीश राणा आणि शिमरॉन हेटमायर या दोघांनीही घोर निराशा केली. नितीश राणा याने 8 तर हेटमायरने 7 धावा केल्या. तसेच इतर फलंदाजही निष्प्रभ ठरले. तसेच कोलकाता नाईट रायडर्सकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 4 जणांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. वैभव अरोरा, हर्षित राणा, मोईन अली आणि वरुण चक्रवर्ती या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर स्पेन्सर जॉन्सन याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
राजस्थानच्या 20 ओव्हरमध्ये 151 धावा
A fighting effort from Dhruv + some big hits from Jofra means we give it our absolute all in the next half. 💪 pic.twitter.com/CV6YaB5OGB
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 26, 2025
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.