IPL 2025, RR vs KKR : विजयाचं खातं कोण उघडणार? राजस्थान की कोलकाता! अशी असू शकते प्लेइंग 11
आयपीएल 2025 स्पर्धेचा दुसरा टप्पा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यापासून सुरु होणार आहे. अर्थात या दोन्ही संघांचा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. त्यात दोन्ही संघांनी पहिला सामना गमवल्याने विजयाची चव चाखण्यासाठी आतुर आहेत.

आयपीएल 2025 स्पर्धेतील सहावा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असून विजयाची चव चाखण्यासाठी आतुर आहेत. कोलकात्याला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 7 विकेट आणि 22 चेंडू राखून पराभूत केलं होतं. तर राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादकडून 44 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे या दोन्ही संघांची स्पर्धेतील सुरुवात ही पराभवाने झाली आहे. त्यामुळे आता दोन्ही पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील आहे. सामन्याचा निकाल लागल्यानंतर एका संघाचं विजयाचं खातं उघडेल, तर एका संघाला पराभवाच्या मालिकेला सामोर जावं लागणार आहे. त्यामुळे पराभवाची मालिका आपल्या वाटेला येऊ नये यासाठी दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतील यात काही शंका नाही. दोन्ही संघ गुवाहाटीच्या बरसप्रा स्टेडियमवर भिडणार आहेत. या ठिकाणी आयपीएलच्या फार काही सामने झालेले नाहीत. पण इथली खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला संधी मिळेल. पण त्यानंतर मात्र ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली राहील. फिरकीपटूंना मधल्या षटकात काही अंशी फायदा होऊ शकतो.
आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ 29 वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांमध्ये तूल्यबळ सामना असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी 14 सामने जिंकले आहेत. एक सामना निकालाविना संपला. यापैकी दोन सामने सुपर ओव्हरमध्ये गेले होते आणि दोन्ही सामने राजस्थान रॉयल्स जिंकले आहेत.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, फजलहक फारुकी.
इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: संदीप शर्मा
कोलकाता नाईट रायडर्स – सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: वैभव अरोरा