रिटेन्शन यादीनंतर संजीव गोयंका यांची झोंबणारी प्रतिक्रिया, केएल राहुलला अप्रत्यक्षरित्या सुनावलं

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वीची रंगीततालिम गुरुवारी पार पडली. मेगा लिलावापूर्वी रिटेन्शन यादी जाहीर करण्यात आली आहे. यात फ्रेंचायझींनी भविष्याचा वेध घेऊन खेळाडूंना रिटेन करायचं की रिलीज त्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ सुपर जायंट्सने पाच खेळाडू रिटेन केले आहेत. रिटेन्शन यादीनंतर मालक संजीव गोयंका यांचं प्रतिक्रिया लक्षवेधी ठरलं आहे.

रिटेन्शन यादीनंतर संजीव गोयंका यांची झोंबणारी प्रतिक्रिया, केएल राहुलला अप्रत्यक्षरित्या सुनावलं
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 8:32 PM

आयपीएल 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं असं म्हणायला हरकत नाही. कारण रिटेन्शन यादी जाहीर झाली असून भविष्याच्या दृष्टीकोनातून खेळाडू रिटेन करण्यात आले आहेत. असं असताना सर्वांचं लक्ष लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीकडे लागून होतं. लखनौ सुपर जायंट्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करते आणि कोणाला रिलीज याबाबतची उत्सुकता लागून होती. गेल्या काही दिवसात केएल राहुल फ्रेंचायझीसोबत खेळण्यास उत्सुक नसल्याची चर्चा रंगली होती. तसेच वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. काही जण 2024 आयपीएल स्पर्धेतील वादाची किनार जोडत केएल राहुल फ्रेंचायझीसोबत खेळण्यास इच्छुक नसल्याचं सांगत होते. त्यामुळे फ्रेंचायझी कोणत्या खेळाडूंना प्राधान्य देते आणि रिलीज करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं होतं. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं असून लखनौने तीन वर्षे कर्णधारपद भूषविलेल्या केएल राहुलला रिलीज केलं आहे. अजूनही लखनौकडे राईट टू मॅचचा पर्याय आहे. मात्र असं असलं तरी लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे. एका अर्थी त्यांनी केएल राहुलवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

‘आम्हाला जिंकणाऱ्या मानसिकतेचे खेळाडू रिटेन करायचे होते. वैयक्तिक आकांक्षापेक्षा संघाच्या विजयाचं हीत जोपासतील.’ अशी प्रतिक्रिया संजीव गोयंका यांनी दिल्यांचं काही मिडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे संजीव गोयंका यांनी अप्रत्यक्षरित्या केएल राहुलला टोमणा मारल्याचं बोललं जात आहे. गेल्या पर्वात संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात भर मैदानात वाद झाला होता. तेव्हापासून केएल राहुल नाराज होता, असं सांगण्यात येत आहे. मध्यंतरी रिटेन्शनबाबत बैठकही पार पडली. पण केएल राहुलने फ्रेंचायझीसोबत खेळण्यास नकार दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. आता हा वाद आणखी चिघळणार असं दिसत आहे.

लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरनवर विश्वास टाकला आहे. त्याला 21 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. त्यामुळे कर्णधारपदाची माळ त्याच्याच गळ्यात पडेल असं दिसत आहे. दुसरीकडे, रवी बिश्नोईला 11 कोटी, मयंक यादवला 11 कोटी, मोहसिन खानला 4 कोटी आणि आयुष बदोनीला 4 कोटी रुपये दिले आहेत. आतापर्यंत लखनौ 120 कोटी रुपयातील एकूण 51 कोटी खर्च केले असून 69 कोटी शिल्लक आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.