Shreyas Iyer पंजाब किंग्स संघाच्या कर्णधारपदी, सलमान खानची Big Boss मधून घोषणा
Shreyas Iyer Captain Of Punjab Kings IPL 2025 : श्रेयस अय्यर याने त्याच्या नेतृत्वात गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. त्यानंतर झालेल्या मेगा ऑक्शनमधून पंजाब किंग्सने श्रेयसला आपल्या ताफ्यात घेतलं. आता अय्यरची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी पंजाब किंग्सने नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमधून अभिनेता सलमान खान याने प्रिती झिंटाच्या संघाच्या नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलंय. मुंबईकर श्रेयस अय्यर याला पंजाब किंग्सचा कर्णधार करण्यात आलं आहे. पंजाब किंग्सनेही सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. रविवारी 12 जानेवारी रोजी बिग बॉस स्पेशल एपिसोड ‘वीकेंड वार’मधून सलमान खान याने श्रेयसचं नाव जाहीर केलं. या खास शोमध्ये फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि शशांक सिंह हे दोघेही उपस्थित होते.
श्रेयस इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू
श्रेयस अय्यर याने त्याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 17 व्या हंगामात (IPL 2024) कोलकाता नाईट रायडर्सला तब्बल 12 वर्षानंतर ट्रॉफी जिंकून दिली होती. मात्र अशा अप्रतिम कामगिरीनंतरही केकेआर फ्रँचायजीने श्रेयसला करारमुक केलं. त्यानंतर मेगा ऑक्शनमधून पंजाब किंग्सने श्रेयसला आपल्या ताफ्यात घेतलं. पंजाबने श्रेयससाठी विक्रमी बोली लावली. पंजाबने श्रेयससाठी तब्बल 26 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावली. श्रेयस अय्यर यासह आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा ठरला.
श्रेयस अय्यर याची आयपीएल कारकीर्द
दरम्यान श्रेयस अय्यर याने आयपीएलमध्ये एकूण 115 सामने खेळले आहेत. श्रेयसने या दरम्यान अनेक संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. श्रेयसने 115 सामन्यांमध्ये 127.48 च्या स्ट्राईक रेटने 3 हजार 127 धावा केल्या आहेत. श्रेयसने या दरम्यान 21 अर्धशतकं लगावले आहेत. तर श्रेयसचा 96 हा हायस्कोअर आहे. तसेच श्रेयसने 271 चौकार आणि 113 षटकार लगावले आहेत.
श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा कर्णधार
𝐒𝐡𝐞𝐫 𝐧𝐚𝐡𝐢, 𝐛𝐚𝐛𝐛𝐚𝐫 𝐒𝐇𝐑𝐄 𝐚𝐚! 🦁🔥#SherSquad, how excited are you to see Shreyas Iyer as our captain? ©️#ShreyasIyer #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/Y7u266jCOU
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 12, 2025
आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी पंजाब किंग्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, पायला अविनाश, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, एरॉन हार्डी, प्रियांश आर्य, कुलदीप सेन, हरनूर पन्नू, अझमतुल्लाह ओमरझई, लॉकी फर्ग्युसन, जॉश इंग्लिस आणि मार्को यानसन