Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs LSG : नाणेफेक जिंकल्यानंतर ऋषभ पंतची प्रथम गोलंदाजीला पसंती, म्हणाला..

आयपीएल 2025 स्पर्धेतील सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची सध्या दहशत आहे. त्यामुळे या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांपुढे मोठं आव्हान आहे. इतकंच काय तर फलंदाजांनाही तशीच कामगिरी करावी लागणार आहे.

SRH vs LSG : नाणेफेक जिंकल्यानंतर ऋषभ पंतची प्रथम गोलंदाजीला पसंती, म्हणाला..
Follow us
| Updated on: Mar 27, 2025 | 7:09 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील दुसरा टप्पा सुरु झाला आहे. अर्थात प्रत्येक संघ आता दुसऱ्या सामन्याला सामोरं जात आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हे देखील दुसरा सामना खेळत आहे. पण या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर मागच्या पराभवाचं दडपण असणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हातातला सामना गमवला. क्षुल्लक चुकांमुळे पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे स्पर्धेत पुनरागमनासाठी लखनौ सुपर जायंट्सला प्रयत्न करावे लागणार आहे. तर सनरायझर्स हैदराबादने या स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सचा दारूण पराभव केला. त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. हे स्थान कायम ठेवण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला. कर्णधार ऋषभ पंतने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. मला वाटते की आपल्याला त्यांना लवकर बाद करावे लागेल आणि लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. हे संघ संयोजनावर अवलंबून आहे, म्हणूनच आपल्याला प्रथम गोलंदाजी करायची आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी आपल्याकडे फलंदाजी आहे. एकमेव बदल म्हणजे आवेश खान परत आला, शाहबाजला बसवलं आहे. त्यांनी जे काही केले त्याचा पाठलाग आपण करू, काही फरक पडत नाही.’

पॅट कमिन्स म्हणाला की, आमच्या खेळाडूंच्या वागण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, आम्ही नेहमीच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. खूप मजा येते. या स्पर्धेत येताना तुम्ही कशासाठी साइन अप करत आहात हे तुम्हाला माहिती आहे. एका षटकात 10 किंवा 11 धावा दिल्या तरी, ते कधीतरी सामना जिंकणारे ठरू शकते. आम्हाला एक संघ म्हणून सामने जिंकायचे आहेत आणि गोलंदाजी युनिट म्हणून चांगली कामगिरी करायची आहे. आशा आहे की आम्ही मोठ्या धावा करू. आम्ही इतर दिवसांप्रमाणेच त्याच संघासोबत खेळत आहोत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव

'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.