IPL 2025 : रिंकु सिंहसोबत 2 वाजून 21 मिनिटांनी काय झालं होतं? टॅटूचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. आरसीबीकडून पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर राजस्थान रॉयल्सला पराभूत करून विजयाचा ट्रॅक पकडला आहे. आता मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. असं असताना रिंकु सिंहच्या टॅटूची चर्चा रंगली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. यंदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम खेळत आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला नमवलं. असं असताना कोलकाता नाईट रायडर्स संघात टॅटू काढण्याचा एक वेगळाच ट्रेंड सुरु आहे. संघातील अनेक खेळाडूंच्या हात किंवा शरीराच्या इतर भागावर टॅटू गोंदवलेला दिसत आहे. विराट कोहलीचा समुराई, सूर्यकुमार यादवचा १८ टॅटू, हार्दिक पंड्याच्या हातावरील सिंह आणि केएल राहुलचा त्याच्या पाठीवर कुत्र्याचा टॅटू प्रसिद्ध आहेत. यात रिंकु सिंहचा टॅटू काहीसा वेगळा आहे. त्याने हातावर एक खास टॅटू गोंदवला आहे. केकेआरचा युट्यूब शो ‘नाईट बाईट’मध्ये शेफ कुणाल खन्नाशी बोलताना रिंकु सिंहने पाच टॅटूंबाबत दिलखुलासपणे सांगितलं. डाव्या हातावर ‘God Plan’ लिहिलेलं आहे. उजव्या हातावर इंकिंग्स आहे ती खूप खास आहे. रिंकुने सांगितलं की, ‘2018 मध्ये जेव्हा केकेआरने मला 80 लाखात खरेदी केलं तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. घर, सुविधा असं काहीच नव्हतं. पण यानंतर माझी आणि कुटुंबाची परिस्थिती चांगली झाली. त्यासाठी मी ‘Family’ लिहिलं आहे.’
रिंकु सिंहच्या हातावर घड्याळाचा टॅटू आणि वेळ आहे 2 वाजून 21 मिनिटं
रिंकु सिंहच्या हातावर एक गुलाबाचा टॅटू आहे. याबाबत त्याने सांगितलं की, ‘ही एक फुलणाऱ्या फुलाबाबत आहे. ही माझ्या चांगल्या प्रवासाची सुरुवात आहे. गुलाब फुललं.’ पण या सर्व टॅटूमध्ये एक घड्याळ आहे आणि त्याचे काटे 2 वाजून 21 मिनिटांवर थांबले आहेत. तेव्हा रिंकु सिंहने सांगितलं की, ‘त्याच वेळेत मला केकेआरने निवडलं होतं. माझी वेळ बदलली.’ यासह रिंकुच्या शरीरावर ‘Peace’ आणि ‘Udaan’ यासह इतक काही चिन्हं गोंदवली आहेत. यातून शांती आणि जीवनात पुढे जाण्याचा संदेश मिळतो.
Game recognizes game 😍🤝 pic.twitter.com/dYs03UnVYG
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 30, 2025
रिंकु सिंहनंतर केकेआरचा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा याचा टॅटूही खास आहे. वैभवच्या हातावरील टॅटू ऑस्ट्रेलियाची लेग स्पिनर अमांडा वेलिंग्टनच्या टॅटूशी मिळताजुळता आहे. अरोरा आपल्या हातावर लिहिलं आहे की, ‘You are your own limit. Remember what you started’. हाच टॅटू अमांडाच्या हातावरही आहे.