IPL : आयपीएलमुळे हे दोन क्रिकेटपटू झाले शत्रू, पैशावरून मैत्रीत दुरावा, असं नेमकं काय झालं?

सध्या आयपीएलचा माहोल आहे. सगळीकडे सध्या आयपीएलचीच चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, याच आयपीएलमुळे दोन क्रिकेटपटू मित्रांमध्ये वाद झाले आहेत.

IPL : आयपीएलमुळे हे दोन क्रिकेटपटू झाले शत्रू, पैशावरून मैत्रीत दुरावा, असं नेमकं काय झालं?
अँड्र्यू सायमंड्स, मायकल क्लार्कImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 8:42 PM

मुंबई : सध्या आयपीएलचा (IPL 2022) माहोल आहे. सगळीकडे सध्या आयपीएलचीच चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, याच आयपीएलमुळे दोन क्रिकेटपटू मित्रांमध्ये वाद झाल्याचं तुम्हाला माहिती आहे का? ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सने (andrew symonds) माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबतच्या (michael clarke) मैत्रीबाबत मोठा खुलासा केला आहे. 2007 च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असलेले सायमंड्स आणि क्लार्क खूप चांगले मित्र होते. दोघे रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळविणाऱ्या संघाचा भाग होते आणि अनेकदा एकत्र फलंदाजी करत होते. पण 2008 मध्ये आयपीएलसाठी खेळाडूंच्या लिलावानंतर त्यांच्या मैत्रीत दुरावा आला. आपण अनेकदा पैशांमुळे मैत्रीत दुरावा आल्याचं अनेदा ऐकलं असेल पण आयपीएलमधीलअँड्र्यू सायमंड्स आणि मायकल क्लार्कचा हा पहिलाच किस्सा असावा. कारण, आयपीएलमध्ये दोन दिग्गज क्रिकेटपटूत वाद झालाय.

नेमकं काय झालं?

सायमंड्सने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीसोबत पॉडकास्टवर बोलताना सांगितले की, आयपीएल लिलावात मिळालेल्या पैशांमुळे त्याची आणि क्लार्कची मैत्री तुटली. सायमंड्स म्हणाले की आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि जेव्हा तो संघात आला तेव्हा आम्ही खूप वेळ एकत्र घालवायचो. पण नंतर गोष्टी बिघडल्या आणि आम्ही एकमेकांशी बोलणे बंद केले. ‘मॅथ्यू हेडनने मला सांगितले की जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा मायकेल क्लार्कला माझ्याशी समस्या होती कारण मला करारामध्ये खूप पैसे मिळाले,’ सायमंड्स म्हणाला.

पैसा विष बनू शकतो

माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स म्हणाला, “पैशामुळे बरेच काही घडू शकते, ते चांगले आहे पण ते विष देखील बनू शकते. मला वाटते की पैसा हे आमच्या नात्यातील विष आहे. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. “म्हणून, मला जास्त काही बोलायचे नाही. आम्ही आता मित्र नाही आणि मला त्यात काही अडचण नाही.”

सायमंड्स महागडा खेळाडू

अँड्र्यू सायमंड्सला आयपीएलच्या पहिल्या सत्रात मोठी रक्कम मिळाली. त्याला डेक्कन चार्जर्सने 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊन विकत घेतले. त्यानंतर तो त्या मोसमातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. सायमंड्सने आयपीएलमध्ये 39 सामन्यात 974 धावा केल्या आणि 20 विकेट घेतल्या. तर क्लार्कला केवळ सहा सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने 98 धावा केल्या. आपण अनेकदा पैशांमुळे मैत्रीत दुरावा आल्याचं अनेदा ऐकलं असेल पण आयपीएलमधीलअँड्र्यू सायमंड्स आणि मायकल क्लार्कचा हा पहिलाच किस्सा असावा. कारण, आयपीएलमध्ये दोन दिग्गज क्रिकेटपटूत वाद झालाय.

इतर बातम्या

PM Narendra Modi : लतादीदींच्या नावाने मिळणारा पुरस्कार जनतेला अर्पण करतो : पंतप्रधान मोदी

Shalini Thackeray : थप्पड मारने से डर नहीं लगता साहब ,पर हनुमान चालीसा से लगता हैं! शालीनी ठाकरे यांनी पुन्हा सेनेला डिवचलं

Students : त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, आपण टुरिस्टला प्रवेश नाकारला ! भारताचं जशास तसं उत्तर…

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.