IPL Royal Challengers Bangalore Team 2021 | विराट-मॅक्सवेलसह अनेक स्फोटक फलंदाज, बंगळुरुची असणार विजेतेपदावर नजर, बघा सर्व खेळाडूंची नावं

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच्या लिलावातून (IPL Auction 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) एकूण 8 खेळाडू खरेदी केले आहेत.

IPL Royal Challengers Bangalore Team 2021 | विराट-मॅक्सवेलसह अनेक स्फोटक फलंदाज, बंगळुरुची असणार विजेतेपदावर नजर, बघा सर्व खेळाडूंची नावं
आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच्या लिलावातून (IPL Auction 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) एकूण 8 खेळाडू खरेदी केले आहेत.
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 1:40 PM

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. या आगामी पर्वासाठी 18 फेब्रुवारीला चेन्नईत खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2021) पार पडला. यामध्ये एकूण 57 खेळाडू हे नशिबवान ठरले. म्हणजेच या खेळाडूंना वेगवेगळ्या संघांनी खरेदी केलं. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एकूण 8 खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. यामध्ये 5 परदेशी तर 3 भारतीय खेळाडू आहेत. बंगळुरुने एकूण 11 खेळाडूंना करारमुक्त केलं होतं. (ipl auction 2021 Royal Challengers Bangalore team see full players list 2021)

बंगळुरुने कायले जॅमिसन (Kyle Jamieson) आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले. बंगळुरुने जॅमिसनसाठी तब्बल 15 कोटी खर्च केले. जॅमिनसनची आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. तर पंजाबने रिलीज केलेल्या मॅक्सवेलसाठी बंगळुरुने 14 कोटी 25 लाख खर्चून आपल्या ताफ्यात घेतलं. सोबतच डॅन ख्रिस्टियनला 4. 80 कोटी (daniel christian) दिले.

तर बंगळुरुने उर्वरित 5 खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईजमध्येच म्हणजेच 20 लाखांमध्ये खरेदी केलं. यामध्ये केएस भरत, मोहम्मद अजहरुद्दीन, रजत पाटीदार आणि सचिन बेबी या खेळाडूंचा समावेश आहे.

बंगळुरुने खरेदी केलेले एकूण 8 खेळाडू

कायले जॅमिसन – 15 कोटी रुपये

ग्लेन मॅक्सवेल- 14.25 कोटी रुपये

डॅन ख्रिस्टियन- 4.80 कोटी रुपये

सचिन बेबी- 20 लाख रुपये

रजत पाटीदार- 20 लाख रुपये

मोहम्मद अजहरुद्दीन- 20 लाख रुपये

केएस भरत- 20 लाख रुपये

सुयश प्रभुदेसाई-20 लाख रुपये

बंगळुरुने कायम ठेवलेले खेळाडू (rcb retained players 2021)

विराट कोहली, मोहम्‍मद सिराज, जोश फिलिप, एबी डिव्हीलियर्स, डॅनियल सॅम्‍स, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, देवदत्‍त पडिक्‍कल, पवन देशपांडे, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, अॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन.

विराटची यंदा विजेतेपदावर नजर

ग्लेन मॅक्सवेल, जॅमिनसन आणि डॅन ताफ्यात आल्याने बंगळुरु आणखी मजबूत झाली आहे. तसेच सोबतीला विराट कोहली आणि मिस्टर 360 अर्थात एबी डी व्हीलियर्स यांच्यासारखे तडाखेदार फंलदाजही आहेत. यामुळे विराटचे यंदा विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्न असणार आहेत.

संबंधित बातम्या :

IPL Mumbai Indians Team 2021 | वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूसह अनेक अनुभवी खेळाडू, पाहा मुंबई इंडियन्सची टीम

IPL Delhi Capitals Team 2021 | गत मोसमात उपविजेत्या ठरलेल्या दिल्लीच्या गोटात तडाखेबाज फलंदाज, अशी आहे टीम

अर्जुन तेंडुलकरवर 20 लाखांची बोली, कोणत्या संघाकडून खरेदी?

(ipl auction 2021 Royal Challengers Bangalore team see full players list 2021)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.