IPL Auction 2024 : अर्जुन तेंडुलकरला शेवटच्या टप्प्यात मिळाला भाव, पण…

आयपीएल मेगा लिलावात कोणाला किती भाव मिळतो याकडे क्रीडाप्रेमींचा नजरा लागल्या होत्या. या लिलावात काही खेळाडू अनसोल्ड राहिले. पण संघांचा कोटी पूर्ण झाला नसल्याने काही खेळाडूंचं पुनरावलोकन करण्यात आलं. या यादीत अर्जुन तेंडुलकरचं नाव होतं.

IPL Auction 2024 : अर्जुन तेंडुलकरला शेवटच्या टप्प्यात मिळाला भाव, पण...
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 10:53 PM

आयपीएल मेगा लिलावात पहिल्या फेरीत बरेच खेळाडू अनसोल्ड राहिले. यात काही खेळाडूंचं पुनरावलोकन करून पुन्हा एकदा लिलावात आणलं गेलं. यात अजिंक्य रहाणे आणि अर्जुन तेंडुलकर यांचं नाव होतं. अजिंक्य रहाणेने आपली बेस प्राईस 1.50 कोटी रुपये ठेवली होती. त्यामुळे त्याला भाव मिळेल की नाही याबाबत शंका होती. पण अजिंक्य रहाणेसाठी कोलकाता नाईट रायडर्सने बोली लावली. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरचं नाव आलं. पण त्याच्यासाठी कोणीच डाव लावला नाही. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर अनसोल्ड राहतो की काय असा प्रश्न होता. पण दुसऱ्या पुनरावलोकन यादीत पुन्हा एकदा अर्जुन तेंडुलकरचं नाव आलं. तेव्हा मुंबई इंडियन्स सोडून कोणीच भाव दिला नाही. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईस 30 लाख होती. त्यामुळे 30 लाखांच्या बेस प्राईससह मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा संघात घेतलं. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच अर्जुन तेंडुलकर मुंबईसोबत आहे. पण त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. या आधीही आहे त्या किमतीत त्याला संघात घेतलं होतं.

अर्जुन हा अनकॅप्ड प्लेयर आहे. रणजी क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. पण त्याची छाप अजूनही हवी तशी पडलेली नाही. आयपीएलमध्ये पाच सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. पाच पैकी एका सामन्यात फलंदाजी केली आहे. यात त्याने 13 धावा केल्या. तर गोलंदाजीत 73 चेंडूत टाकले असून 114 धावा देत 3 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 9.37 राहिला आहे. कोलकात्याविरुद्ध 16 एप्रिल 2023 रोजी मैदानात पहिल्यांदा उतरला होता. तर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मागच्या पर्वात शेवटचा खेळला होता. तेव्हा 2.2 षटकं टाकून दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. तेव्हा त्याने 14 चेंडूत 22 दिल्या होत्या.

मुंबई इंडियन्सचा संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, विल जॅक्स, नमन धीर, अल्लाह गजनफर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, लिजाद विल्यम्स, रीस टॉप्ले, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विग्नेश पुथूर, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॉन जेकॉब, वेंकटा पेनमेत्सा, राज अंगद बावा, श्रीजिथ क्रिष्णण, अश्विनी कुमार

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.