पंजाब किंग्सने 11.75 कोटी मोजत हर्षल पटेलला घेतलं ताफ्यात, सुरेश रैनाने लगेच दिला मोठा सल्ला

आयपीएल 2024 मिनी लिलावात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची तर चांदी झाली आहे. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्ससाठी सर्वाधिक बोली लागली. तर ट्रेव्हिस हेडला बेस प्राईसच्या तीन पट अधिक रक्कम मिळाली. असं असताना हर्षल पटेलसाठी सर्वाधिक बोली लागली. त्याच्यासाठी पंजाब किंग्सने 11.75 कोटी रुपये मोजले.

पंजाब किंग्सने 11.75 कोटी मोजत हर्षल पटेलला घेतलं ताफ्यात, सुरेश रैनाने लगेच दिला मोठा सल्ला
हर्षल पटेलसाठी पंजाब किंग्सने मोजली मोठी रक्कम, सुरेश रैनाने धवनबाबत सांगितलं असं काही...
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 5:10 PM

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेतील लिलावाने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व लिलावातील बोलींचा यात रेकॉर्ड मोडला. खेळाडूंसाठी 20 कोटींच्या पार रक्कम मोजली गेली आहे. पॅट कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी, तर मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपये मोजले आहेत. असं असताना हर्षल पटेलसाठी लागलेल्या बोलीनेही लक्ष वेधून घेतलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हर्षल पटेलला रिलीज केलं होतं. पण त्याला नशिबाची जोरदार सधा मिळाली. पंजाब किंग्सने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. 11.75 कोटी रुपये खर्च करून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. आयपीएल लिलावात त्याची बेस प्राईस दोन कोटी रुपये होती. हर्षल पटेल मागच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता. आरसीबीने त्याला मागच्या हंगामने 10.75 कोटी रुपये देत रिटेन केलं होतं. आता त्या रकमेच्या 1 कोटी जास्त रक्कम मिळाली आहे. त्याच्यासाठी पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली.

पंजाब किंग्सचं नेतृत्व शिखर धवनकडे आहे. त्याच्या नेतृत्वात हर्षल पटेल खेळताना दिसणार आहे. लिलावाचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर ब्रेक झाला आणि समालोचकांनी थेट हर्षल पटेलशी संवाद साधला. त्यांनी हर्षल पटेलला लिलावाबाबत बरेच प्रश्न विचारले. तसेच पंजाबकडून खेळणार आहेस तर पंजाबी शिक असा सल्लाही देण्यात आला. तेव्हा हर्षलने हरयाणाकडून खेळलो असून पंजाबी येते असं सांगितलं. यावेळी सुरेश रैनाने त्याला मिश्किलपणे एक प्रश्न विचारत सांगितलं की, “शिखर धवनला सांग की मी पण संघात आहे मला पण ओव्हर दे. नाही तर तो विसरून जातो. कारण त्याला विसरण्याची सवय आहे.” सुरेश रैनाने असं बोलताच एकच हास्यकल्लोळ झाला.

हर्षल पटेलकडे आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. आयपीएल स्पर्धेत 2012 पासून खेळत आहे. मागच्या 11 हंगामात त्याने 91 सामने खेळले आहेत. 91 सामन्यात त्याने 24.07 च्या सरासरीने आणि 8.59 च्या इकॉनोमी रेटने 111 गडी बाद केले आआहे. त्याने दोन वेळा 4 गडी बाद करण्याची किमया साधली आहे. तसेच एका पाच गडी टिपले आहेत. तसेच फलंदाजी करत 236 धावा केल्या आहेत.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.