IPL Auction : आयपीएल लिलावात ऋषभ पंतने मोडले सर्व रेकॉर्ड, लखनौसमोर दिल्लीचं आरटीएम कार्डही गेलं फेल

आयपीएल लिलावात ऋषभ पंतने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. ऋषभ पंतसाठी लखनौ सुपरजायंट्सने आपला पेटारा खुला केला होता. त्यामुळे बोली लावताना मागेपुढे पाहिलं नाही. लखनौने सुरुवातीपासूनच ऋषभ पंतासाठी बोली लावली आणि शेवटपर्यंत राहिले.

IPL Auction : आयपीएल लिलावात ऋषभ पंतने मोडले सर्व रेकॉर्ड, लखनौसमोर दिल्लीचं आरटीएम कार्डही गेलं फेल
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 7:32 PM

आयपीएल मेगा लिलाव 2025 सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये सुरु आहे. पहिल्या मॉर्की प्लेयर्स सेटमध्ये सहा खेळाडू उतरले होते. या यादीत अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, श्रेयस अय्यर, मिचेल स्टार्क, जोस बटलर आणि ऋषभ पंत हे खेळाडू होते. पहिल्या सेटमधील हे 6 खेळाडू घेण्यासाठी 110 कोटी रुपयांची किंमत फ्रेंचायझींना मोजावी लागली आहे. या यादीत कोण सर्वाधिक भाव खाऊन जातो याकडे लक्ष लागून होतं. कारण या लिलावापूर्वीच ऋषभ पंत 30 कोटीपर्यंत रक्कम घेऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसंच काहीसं लिलावात पाहायला मिळालं. मॉर्की प्लेयर्स यादात ऋषभ पंतचं नाव सर्वात शेवटी आलं. त्यामुळे त्यासाठी लखनौ सुपर जायंट्स पहिल्यापासूनच फिल्डिंग लावून ठेवली होती. ऋषभ पंतची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. लखनौ ऋषभ पंतचं नाव घोषित होताच लखनौने हात वर केला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने यात उडी घेतली. मग काय बोली 10 कोटींच्या वर पोहोचली. पण लखनौचा पवित्रा पाहून आरसीबीने काढता पाय घेतला.

ऋषभ पंत स्वस्तात जाईल असं वाटत होतं. पण सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारन यांनी एन्ट्री मारली आणि बोली 20 कोटीच्या पार घेऊन गेली. पण लखनौ सुपर जायंट्स काहीही करण्यास तयार असल्याचं दिसलं. लखनौ सुपर जायंट्स 20 कोटी 75 लाखांची बोली लावली आणि हैदराबादची बोली लावण्याची रेस संपली. पण हा खेळाडू 20.75 लाखाला जाईल असं वाटत असताना दिल्ली कॅपिटल्सची परवानगी घेण्यात आली. कारण त्यांच्याकडे आरटीएम कार्ड होतं. लिलावकर्त्यांनी आरटीएमसाठी लखनौ सुपर जायंट्सकडे बोली मागितली. तेव्हा लखनौने 27 कोटींची बोली लावली. इतकी मोठी बोली ऐकून दिल्लीच्या पायाखालची वाळू सरकली आणि आरटीएम कार्ड सोडून दिलं. 27 कोटी मोजून ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्स संघासोबत आला.

लखनौ सुपर जायंट्सने केएल राहुलला रिलीज केल्यानंतर एका कर्णधाराच्या शोधात होते. अखेर ऋषभ पंतच्या रुपाने कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन मिळाला आहे. ऋषभ पंत 111 आयपीएल सामने खेळला आहे. त्यात 110 डावात खेळला आहे. त्यात त्याने 3284 धावा केल्या आहेत. यात 128 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा 148.93 इतका आहे. ऋषभ पंतने 1 शतक आणि 18 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने आयपीएलमध्ये 296 चौकार आणि 154 षटकार मारले आहेत.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.