IPL Auction : या खेळाडूने लिलावापूर्वीच वाढवला आपला भाव! 200 च्या स्ट्राईक रेटने केल्या धावा

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. या मेगा लिलावाची तारीख आता जवळ येत चालली आहे. तसेच खेळाडूंच्या फॉर्मबाबत चर्चा रंगताना दिसत आहे. सध्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंची जोरदार चर्चा रंगली आहे. भारत दक्षिण अफ्रिका सामन्यात असंच एका खेळाडूने लक्ष वेधून घेतलं आहे आणि लिलावापूर्वीच आपलं वजन वाढवून घेतलं आहे.

IPL Auction : या खेळाडूने लिलावापूर्वीच वाढवला आपला भाव! 200 च्या स्ट्राईक रेटने केल्या धावा
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 6:49 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका सुरु असून दोन सामने पार पडले. या दोन सामन्यात काही खेळाडूंचा खेळ पाहता आयपीएल लिलावात काही खेळाडू भाव खाऊन जाणार असंच दिसत आहे. लिलावापूर्वी जगभरातील टी20 मालिकांकडे 10 फ्रेंचायझींचं लक्ष लागून आहे. फॉर्मात असलेला खेळाडू आपल्या संघात असावा यासाठी आटापीटा असणार आहे. असं असताना आतापर्यंत दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात दोन सामने पार पडले आहेत. यात अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याने लक्ष वेधून घेतलं आह. त्यामुळे फ्रेंचायझींच्या विशलिस्टमध्ये असणार यात शंका नाही.गेराल्ड वेगवान गोलंदाज आहे, तसेच फलंदाजीतही कमाल करू शकतो हे दाखवून दिलं आहे. मागच्या पर्वात गेराल्ड कोएत्झी मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. तेव्हा मुंबईने त्याच्यासाठी पाच कोटी मोजले होते आणि संघात घेतलं होतं. पण आता मुंबईने त्याला रिलीज केलं आहे. त्यामुळे त्याच्या मोठी बोली लागणार यात शंका नाही.

आयपीएल मेगा लिलावात त्याने बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी बोली या किंमतीपासूनच लागणार आहे. विशेष म्हणजे मुंबईने पाच खेळाडू रिटेन केले असून एक आरटीएम कार्ड आहे. त्यामुळे मुंबई हे कार्ड इशान किशनसाठी वापरणार की गेराल्ड कोएत्झीसाठी हे त्यांच्या लिलावातील बोलीवर ठरणार आहे. दरम्यान, गेराल्डने दुसऱ्या टी20 सामन्यात विजयात मोलाची भूमिका बजावली होती. 86 धावांवर दक्षिण अफ्रिकेचे 7 खेळाडू बाद झाले होते. तेव्हा ट्रिस्टन स्टब्ससोबत गेराल्डने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याने 9 चेंडूत 19 धावा ठोकल्या. यात दोन चौकार आणि एक उत्तुंग षटकार मारला.

गेराल्डची खेळी पाहता दुहेरी बजावणारा वेगवान गोलंदाज ताफ्यात असावा असं कोणाला वाटणार नाही. त्यामुळे गेराल्ड या लिलावात चांगलाच भाव खाऊन जाणार आहे. पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स हे संघ गेराल्डसाठी बोली लावतील यात शंका नाही.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.