IPL Auction 2021 | ‘केरळ एक्सप्रेस’ एस श्रीसंतला मोठा झटका, आयपीएल खेळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार
आयपीएल प्रशासनाने 11 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रियेसाठी (ipl auction 2o21) खेळाडूंची यादी जाहीर केली.
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीची (IPL 2021) उत्सुकता शिगेला पोहचली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसात 18 फेब्रुवारीला चेन्नईत आगामी मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया (IPL Auction 2021) पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेआधी टीम इंडियाचा क्रिकेटपटू एस श्रीसंतला (S sreesanth) मोठा झटका बसला आहे. आयपीएलच्या या मोसमात खेळण्यासाठी श्रीसंत उत्सुक होता. यासाठी त्याने आपलं नाव नोदंवलं होतं. पण आयपीएल मॅनेजमेंटने तगडा झटका दिला आहे. श्रीसंतची मॅनेजमेंटने लिलावसाठी निवड केलेली नाही. त्यामुळे श्रीसंतला क्रिकेट खेळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. (ipl auction 2o21 s sreesanth are not selected in auction list)
NEWS ?: 1097 players register for IPL 2021 Player Auction
More details? https://t.co/DSZC5ZzTWG pic.twitter.com/BLSAJcBhES
— IndianPremierLeague (@IPL) February 5, 2021
नक्की काय झालं?
सर्वसाधारणपणे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना नोंदणी करणं आवश्यक असतं. त्यानुसार श्रीसंतने आपलं नाव नोंदवलं. या मोसमासाठी एकूण 1 हजार 97 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं. नाव नोंदवल्यानंतर आयपीएल मॅनेजमेंट अर्ज केलेल्या एकूण खेळाडूंपैकी आवश्यक खेळाडूंची यादी जाहीर करते. आयपीएलने ही यादी 11 फेब्रुवारीला जाहीर केली. यामध्ये लिलाव प्रक्रियेसाठी 1 हजार 97 खेळाडूंपैकी292 खेळाडूंची निवड करण्यात आली. या यादीत श्रीसंतचं नाव नव्हतं. म्हणजेच श्रीसंत लिलावासाठी पात्र ठरला नाही. यामुळे श्रीसंतसाठी हा मोठा धक्का आहे.
ALERT?: VIVO IPL 2021 Player Auction list announced
2⃣9⃣2⃣ players set to go under the hammer in Chennai on February 18, 2021 ?
More details ? https://t.co/m8oEWWw4tg pic.twitter.com/881TWQifah
— IndianPremierLeague (@IPL) February 11, 2021
श्रीसंत काय म्हणाला?
“मी आपल्याशी संवाद साधतोय. मला तुमच्याकडून सहानभूती नकोय. माझी निवड झाली नाही. पण मी यामुळे खचून जाणार नाही. मला फक्त तुमचा पाठिंबा आणि प्रेम हवयं, यानेच मी आनंदी आहे. यावेळेस माझी निवड झाली नाही. पण मी पुढच्यावेळेस आणखी जोमाने तयारी करेन. मी सातत्याने प्रयत्न करेन”, असं श्रीसंत म्हणाला. श्रीसंतने इंस्टाग्रामवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळेस त्याने याबाबतची प्रतिक्रिया दिली.
आयपीएल 2021 कधी सुरु होणार ?
आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन हे भारतातच होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्यातच आता या मोसमाची तारीखही जवळपास निश्चित झाल्याचं समजत आहे. 11 एप्रिलपासून या 14 व्या मोसमाला सुरुवात होणार असल्याचे वृत्त मीडिया रिपोर्टनुसार देण्यात आलं आहे.
दरम्यान याबाबत आयपीएल प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विजय हजारे ट्रॉफी आणि वुमन्स वनडे सीरिजनंतर आयपीएलच्या 14 व्या मोसमाला सुरुवात होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार या मोसमातील अंतिम सामना 5 किंवा 6 जूनला खेळवण्यात येऊ शकतो. यानुसार बीसीसीआयची टी-20 स्पर्धा साधारण 56 दिवस चालू शकते.
संबंधित बातम्या :
IPL 2021 auction | लिलाव प्रक्रियेत 292 खेळाडू, जाणून घ्या 2 कोटींच्या बेस प्राईजमधील खेळाडूंची नावं
IPL 2021 Auction Date | IPL 2021 च्या लिलावाची जय्यत तयारी, तारीख आणि ठिकाण ठरलं
(ipl auction 2o21 s sreesanth are not selected in auction list)