ipl auction आधीच धोनीच्या ‘या’ खास मराठमोळ्या भिडूला केलं बाहेर, क्रिकेट वर्तुळात चर्चांणा उधाण
IPl Auction 2024 : यंदा आयपीएल सुरू होण्याआधीच मोठी चर्चा होताना दिसत आहे. अशातच आयपीएलच्या लिलावाआधीच एका मराठमोळ्या खेळाडूला शॉर्टलिस्ट केलं नसल्याची माहिती समोर आली आहे. कोण आहे ते खेळाडू जाणून घ्या.
मुंबई : यंदाची आयपीएल 2024 सुरू होण्याआधीपासूनच चर्चेत आहे. आयपीएलचा लिलाव येत्या 19 डिसेंबरला पार पडणार आहे. आयपीएलच्या अधिकृत (एक्स) हँडलवरून अधिकृत खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या लिलावामध्ये तब्बल 1100 खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्यामधील 333 खेळाडूंचीच नाव लिलावाच्या यादीमध्ये ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या खेळाडूंची नावं यादीमध्ये आली नाहीत त्यांना लिलावामध्ये सहभागी होता येणार नाही. मात्र एका मोठ्या खेळाडूचं नाव त्यातून वगळण्यात आलं आहे.
कोण आहे तो खेळाडू?
हा खेळाडू सीएसके संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा जवळचा होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून मराठमोळा केदार जाधव आहे. केदार जाधव याला शॉर्टलिस्ट केलेलं नसून त्याने आपली बेस प्राईज 2 कोटी ठेवली होती. मागील लिलावामध्ये केदार जाधव याला कोणत्याच संघाने बोली लावली नव्हती. सीझन सुरू असताना आरसीबीचा डेव्हिड विली जखमी झाल्याने त्यांनी केदार जाधव याला संघात स्थान दिलं होतं. मात्र यंदा त्याला शॉर्टलिस्टच न केल्यान क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
केदार जाधव याच्यासह आणखी दोन खेळाडूंना शॉर्टलिस्ट केलेलं नाही. इंग्लंडचा टॉम बेंटन आणि श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज यांचाही यामध्ये समावेश आहे. तिघांचीही बेस प्राईज ही 2 कोटी होती, केदार जाधव आणि मॅथ्यूज मोठे खेळाडू आहेत.
दोन कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू
हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, मुस्तफिजुर रहमान, अँजेलो मॅथ्यूज, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक यांचा समावेश होता. , डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, लॉकी फर्ग्युसन, गेराल्ड कोएत्झी