IPL Final 2023 Narendra Modi Stadium | नरेंद्र मोदी स्टेडियममुळे भारताची जगात नाचक्की
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल 2023 फायनलचं आयोजन करण्यात आलंय. मात्र पावसामुळे क्रिकेट चाहत्यांची गैरसोय झाली. त्यामुळे नेटकऱ्यांनी गैरसोयीवरुन संताप व्यक्त केला आहे.
अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामना हा 28 मे रोजी आयोजित करण्यात आला होता. आयपीएल 2023 फायनल सामन्याचं आयोजन हे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं. मात्र पावसामुळे 28 मे रोजी सामना होऊ शकला नाही. त्यामुळे आता या सामन्याचं राखीव दिवशी आयोजन करण्यात आलं आहे. या महाअंतिम सामन्यासाठी 29 मे हा राखीव दिवस आहे.
हा महामुकाबला पाहण्यासाठी चाहते चेन्नई आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आले होते. मात्र पावसामुळे त्यांचा हिरमोड झाला. चाहते पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मिळेल तिथे उभे राहिले. तर काही चाहत्यांना अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर रात्र काढावी लागली.
नरेंद्र मोदी स्टेडियमचं आधीचं नाव हे मोटेरा स्टेडियम असं होतं. या स्टेडियमला आधी सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव होतं. मात्र मोटेरा स्टेडियम पाडून पुन्हा नव्याने बांधण्यात आलं. भव्यदिव्य असं स्टेडियम बांधण्यात आलं. मोठा गाजावाजा करत 2 वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी 2021 स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. तेव्हाच मोटेरा स्टेडियमचं नरेंद्र मोदी स्टेडियम असं नामकरण करण्यात आलं.
हे स्टेडियम सर्व सुविधांनी परिपूर्ण असं आहे. आसन क्षमतेनुसार हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. हे स्टेडियम जगातील दुसरं सर्वात महागडं स्टेडियम आहे. मात्र या पावसामुळे सर्वकाही उघड पडलं. भारताची जगात नाचक्की झाली.
आयपीएलच्या महाअंतिम सामन्याचं आयोजन ज्या स्टेडियममध्ये करण्यात येत असेल, तर त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा असायला हव्यात. पाऊस झाल्यास कमीत कमी वेळेत झटपट पाणी काढण्याची आधुनिक यंत्रना तिथे असायवा हवी. हे सर्व निकष लक्षात घेऊनच अंतिम सामन्याचं आयोजन हे करायलं हवं. मात्र या पावसानिमित्ताने गलथान कारभार समोर आला आहे. बीसीसीआय आणि आयपीएलचा चेहरा उघड पडला. त्यामुळे भारताची जगात नाचक्की झाली, अशा शब्दात नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.
क्रिकेट चाहत्यांवर स्टेशनवर झोपण्याची वेळ
It is 3 o'clock in the night when I went to Ahmedabad railway station, I saw people wearing jersey of csk team, some were sleeping, some were awake, some people, I asked them what they are doing, they said we have come only to see MS Dhoni @IPL @ChennaiIPL #IPLFinal #Ahmedabad pic.twitter.com/ZJktgGcv8U
— Sumit kharat (@sumitkharat65) May 28, 2023
बीसीसीआयने खबरदारी घेत तसेच हवामानाचा अंदाज बांधून सामन्याचं आयोजन हे दुसऱ्या ठिकाणी करायला हवं होतं. आता पावसामुळे सामना राखीव दिवसापर्यंत गेला. तसेच प्रामुख्याने क्रिकेट चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.स्टेडियम प्रशासनाकडून अशा परिस्थितीत क्रिकेट प्रेमींची राहण्याची सोय करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. मात्र तसंही काही झालं नाही.