IPL 2023 Final Rain | महाअंतिम सामन्यात पाऊस, स्पंजने पीचवरील पाणी पुसायची वेळ, Bcci ला उघडं पाडलं
IPL FInal 2023 Ahmedabad Rain | जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये पावसामुळे खेळपट्टी ओली झाली आहे. ही खेळपट्टी कोरडी करण्यासाठी चक्क स्पंजचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीायला ट्रोल केलं जात आहे.

अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स टीमने चेन्नईला पाचव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. चेन्नईची सलामी जोडी या 215 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. मात्र अवघ्या 3 बॉलनंतर पावसाची एन्ट्री झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. हा पाऊस इतका जोरात होता की कव्हर्स टाकल्यानंतरही खेळपट्टी ओली झाली. सामना लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी ग्राउंड्समॅन प्रयत्नांची पराकाष्ठा करतायेत.
मात्र लाजिरवाणी बाब म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी बिरुदावली मिरवणाऱ्या बीसीसीआयवर खेळपट्टी सुकवण्यासाठी स्पंजचा वापर करण्याची वेळ ओढावली. त्यामुळे बीसीसीआयची नाचक्की झाली आहे. या पावसामुळे पावसाने बीसीसीआयचा चेहरा उघडा पाडलाय.
या पावसाने महाअंतिम सामन्यात गुजरात टायटन्सपेक्षा जास्त बॅटिंग केलीय. खरंतर फायनल मॅचचं आयोजन हे 28 मे रोजी करण्यात आलं होतं. मात्र पावसानेच बॅटिंग केल्याने सामना 29 मे रोजी खेळवण्यात येणार असल्याचं ठरलं. सुदैवाने 29 मे रोजी पावसाच्या अडथळ्याविना सामना सुरु झाला. त्यामुळे चाहचे सुखावले. मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होते तितक्यात पाऊस पुन्हा आला.
आता पाऊस आल्याने ग्राउंड्समॅन्सने खेळपट्टी कव्हरने झाकली. मात्र तो पाऊसच. पावसाने खेळपट्टी धुवून काढली. कव्हर काढल्यानंतर खेळपट्टी ओली झाली होती. त्यामुळे ग्राउंड्समॅनकडून खेळपट्टीवरील पाणी खेचून घेण्यासाठी स्पंजचा वापर करण्यात आला. खेळपट्टीवरील पाणी स्पंजने पुसतानाचे अनेक व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
स्पंजने पाणी पुसण्याची वेळ
Respect To Groundsmen #rain #CSKvGT #GTvsCSK #IPL2023Finals pic.twitter.com/xXqVmdH3ga
— SD 18 (@SD_SUBHA_FF) May 29, 2023
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी बीसीसीआयची ओळख. मात्र बीसीसीआयवर अशा प्रकारे खेळपट्टीवरील पाणी सुकवण्याची वेळ ओढावली. त्यामुळे बीसीसीआयला आणि पर्यायाने बीसीसीआय सचिव जय शाह यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. कोट्यवधींची कमाई करणाऱ्या बीसीसीआयकडे मैदान सुकवण्यासाठी यंत्रणा नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी बीसीसीआयला चांगलंच सुनावलं आहे.
बीसीसीआयवर टीका
Dear @TheBarmyArmy how expensive is this? Can you please lend this to @BCCI @JayShah as the richest board is unfortunately unable to afford. We swear we’ll return it right after the World Cup! ?? #CSKvGT #Rain #IPL2023Finals pic.twitter.com/KT5JBx81Z3
— ?????? (@sopranonitish) May 29, 2023
ग्राउंड्समॅन्सना सलाम
या सततच्या पावसामुळे ग्राउंड्समॅनची चांगलीच तारांबळ उडाली आहे. खेळपट्टीचं नुकसान होऊ नये, मैदान ओलं होऊ नये, यासाठी ही मंडळी कायम काळजी घेत असते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 28 मे पासून पाऊस होतोय तो आतापर्यंत सुरुय. या पावसापासून खेळपट्टीचं आणि मैदानाचं संरक्षण करण्यासाठी या संपूर्ण कर्मचारी वर्गाने जीव ओतून मेहनत घेतलीय. त्यामुळे या संपूर्ण कर्मचाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.
Much Respect To the Ground workers working hard to clear the pitch by their desi jugaad @IPL #IPL #GTvsCSK #IPL2023Finals #rain @RVCJ_FB pic.twitter.com/deSrgYh4ad
— Rohit Chourasiya RC (@rohhitttttttt_) May 29, 2023
दरम्यान आता खेळपट्टीची पाहणी 11 वाजून 30 मिनिटांनी करण्यात येणार आहे. त्यानंतर खेळ कधी आणि किती वाजता सुरु होणार, हे ठरेल.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.