IPL Final : फायनल होणार 15 ओव्हरची, सीएसकेला जिंकण्यासाठी ‘इतक्या’ धावांचं आव्हान
IPL Final : फायनलमध्ये मोठा ट्विस्ट आला असून आता सीएसकेला जिंकण्यासाठी नवीन टार्गेट देण्यात आलं आहे.

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यमधील फायनल सामन्यात आणखी एक ट्विस्ट आला आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 215 धावांचं आव्हान सीएसकेला जिंकण्यासाठी दिलं होतं. मात्र आजही पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला होता. मैदानावरील पाणी घालवत पिच तयार करत डकवर्थच्या नियमानुसार सीएसकेला 171 धावांचं टार्गेट देण्यात आलं आहे. मात्र हे आव्हान 15 ओव्हरमध्येच त्यांना पूर्ण करायचं आहे.
12 वाजून 10 मिनिटांनी सामना सुरू होणार आहे. यामध्ये आता पॉवर प्ले 4 ओव्हर्सचा असणार असून 5 गोलंदाज 3 ओव्हर टाकू शकतात. आयपीएलमध्ये पहिल्यांदा तिसऱ्या दिवशी फायनल सामना सुरू आहे. कारण 28 मे संध्याकाळी हा सामना सुरू होणार होता. पहिला दिवस पावसाने घालवला त्यानंतर सोमवारी गुजरातची बॅटींग झाल्यावर परत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सामना थेट बुधवारी 12. 10 मिनिटांनी सुरू झाला आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (W), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋुतुराज गायकवाड़, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा