“…गर्लफ्रेंडला आणू का?”, गौतम गंभीर आणि सुनील नरीन यांच्यात असा झाला पहिला संवाद

आयपीएल 2024 स्पर्धा पार पडली असून जेतेपदाचा मान कोलकाता नाईट रायडर्स संघाला मिळाला आहे. कोलकात्याने अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरलं. कोलकात्याच्या विजयात सुनील नरीन आणि गौतम गंभीर यांचा मोलाचा वाटा आहे. असं असताना गौतम गंभीर सुनील नरीनचा एक किस्सा सांगितला आहे.

...गर्लफ्रेंडला आणू का?, गौतम गंभीर आणि सुनील नरीन यांच्यात असा झाला पहिला संवाद
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 6:05 PM

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने अपेक्षेप्रमाणे यश मिळवलं आहे. पहिल्या सामन्यापासून कोलकात्याचा चढता आलेख कायम राहिला. साखळी फेरीत संघ टॉपला राहिला आणि क्वॉलिफायर 1 जिंकून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादला कुठेच विजयाची संधी दिली नाही आणि सहज विजय मिळवला. कोलकात्याला जेतेपद मिळाल्यानंतर गौतम गंभीरने आपल्या कर्णधारपदाच्या कार्यकाळातील एक किस्सा उघड केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व 2011-12 मध्ये गौतम गंभीरकडे होतं. तेव्हा सुनील नरीन संघात नवखा होता. खूपच कमी बोलायचा असं गंभीरने सांगितलं. गौतम गंभीरने एका मुलाखतीत सुनील नरीनसोबतच्या मैत्रीचा उलगडा केला. इतकंच काय तर या दोघही एकमेकांना भावाप्रमाणे मानतात. कोलकात्याने 2012 आणि 2014 मध्ये जेतेपद मिळवलं होतं तेव्हा सुनील नरीनने चमकदार कामगिरी केली होती. गौतम गंभीरने स्पोर्टकीडाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मी आणि सुनील नरीन जवळपास एकाच स्वभावाचे आहोत. आमच्या भावना एक सारख्याच आहेत.”

“मला आजही आठवते की, नरीन 2012 मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळण्यासाठी आला होता. तेव्हा आम्ही जयपूरमध्ये सराव करण्यासाठी जाणार होतो. तेव्हा मी त्याला दुपारच्या जेवणासाठी बोलवलं. तो इतका लाजरा होता की त्याने या दरम्यान एकही शब्द बोलला नाही. पण हिमत करून जेव्हा त्याने पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे मी माझ्या गर्लफ्रेंडला आयपीएल पाहण्यासाठी आणू शकतो का?”

“नरीन पहिल्या पर्वात खूपच शांत होता. पण आता आम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करू शकतो. तो मला भावासारखा आहे. मी त्याला मित्र मानतच नाही. त्याला भाऊ म्हणूनच गृहीत धरतो. जेव्हा मला त्याची गरज असते किंवा त्याला असते तेव्हा आम्ही एक कॉलच्या अंतरावर असतो. आम्ही या पद्धतीचं नातं तयार केलं आहे. आम्ही जास्त उत्साहित होत नाही. भावनांचं प्रदर्शन करत नाहीत. आम्ही दिखाऊबाज नाहीत. आम्ही फक्त काम करतो आणि परत येतो.”, असं गौतम गंभीर पुढे म्हणाला.

एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.