VIDEO | कोण आला रे कोण आला, CSK चा ऋतू आला, पिंपरी चिंचवडमध्ये आजच दसरा दिवाळी
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने यंदा सर्व चेन्नई समर्थकांची आणि क्रिकेरसिकांची मनं जिंकली. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने सर्वाधिक म्हणजेच 635 धावा करत ऑरेंज कॅपदेखील पटकावली.
पुणे : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने यंदा सर्व चेन्नई समर्थकांची आणि क्रिकेरसिकांची मनं जिंकली. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने सर्वाधिक म्हणजेच 635 धावा करत ऑरेंज कॅपदेखील पटकावली. आयपीएल संपवून ऋतुराज गायकवाड आज भारतात परतलाय. यावेळी त्याचे पिंपरी चिंचवडकरांनी फटाक्यांच्या आतषबाजीत सकाळी दमदार स्वागत केले. ऋतुराज घरी आज परत येणार असल्याची माहिती नसल्याने व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनीही ऋतुराज दिसताच त्याला शुभेच्छा दिल्या. (IPL Hero Ruturaj Gaikwad returns home, Strong welcome from Pimprikar with fireworks)
ऋतुराजने यंदाच्या आयपीएलमध्ये 16 सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व केलं. यात त्याने 4 अर्धशतकं आणि एका शतकाच्या सहाय्याने 635 धावा फटकावल्या. त्याची सरासरी 45.35 तर स्ट्राईक रेट 136.26 इतका होता. यंदाच्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक 64 चौकार फटकावले, तसेच 23 षटकारही ठोकले.
IPL चा 14 वा इमर्जिंग प्लेयर ऋतुराज गायकवाड
चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला IPL 2021 या पर्वाचा इमर्जिंग प्लेयर हा पुरस्कार देण्यात आला. दरवर्षी हा खिताब एका नव्या खेळाडूला दिला जातो. आतापर्यंत हा मान मिळालेले 14 पैकी 13 खेळाडू भारतीय असून एकमेव विदेशी खेळाडू म्हणजेच बांग्लादेशचा मुस्तफिजूर रेहमान याला हा मान मिळाला आहे.
इमर्जिंग प्लेयर हा पुरस्कार मिळण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. जसंकी संबधित खेळाडू हा 1 एप्रिल 1995 नंतर जन्माला आलेला असायला हवा. तो कमीत कमी 5 टेस्ट किंवा 20 हून कमी वनडे सामने खेळेलेला हवा. तिसरा म्हणजे IPL मध्येही 25 हून कमी सामने खेळलेला हवा. तसंच याआधी त्याने हा खिताब जिंकलेला नसणे गरजेचे असते. या सर्वांमध्ये बसून जो संपूर्ण पर्वात उत्कृष्ट खेळी करतो त्याला हा खिताब दिला जातो.
IPL च्या सर्वात पहिल्या पर्वाचा इमर्जिंग प्लेयर हा पुरस्कार श्रीवत्स गोस्वामी याला देण्यात आला होता. त्यानंतर 2009 मध्ये रोहित शर्मा याला हा मान मिळाला. तेव्हा तो डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता. 2010 मध्ये मुंबई इंडियन्सच्या सौरभ तिवारीला आणि 2011 मध्ये इकबाल अब्दुल्लाला पुरस्कार मिळाला. 2012 आणि 2013 ला अनुक्रमे पंजाबच्या मंदीप सिंगला तर राजस्थानच्या संजू सॅमसनने हा मान मिळवला. तर 2014 मध्ये पंजाबच्या अक्षर पटेलने आणि 2015 मध्ये दिल्लीच्या श्रेयस अय्यरने पुरस्कार स्वत:च्या नावे केला. IPL 2016 मध्ये पहिल्यांदा हा खिताब परदेशी खेळाडूने मिळवला. बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रेहमानने सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना हा मान मिळवला. 2017 मध्ये गुजरात लायन्सच्या बेसिल थंपीने हा मान मिळवला. त्यानंतर 2018 ते 2020 सीजनमध्ये अनुक्रमे हा खिताब ऋषभ पंत, शुभमन गिल आणि देवदत्त पडिक्कल यांना मिळाला.
इतर बातम्या
T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब
आधी तोरा मिरवला पण शेवटी वठणीवर आले, पाकड्यांच्या जर्सीवर आता सन्मानाने दिसतोय ‘इंडिया’
(IPL Hero Ruturaj Gaikwad returns home, Strong welcome from Pimprikar with fireworks)