Retirement | अंतर्गत राजकारणामुळे कारकीर्द संपवली, खेळाडूकडून 31 व्या वर्षीच क्रिकेटला रामराम
क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेणं हे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी आव्हानात्मक असतं. मात्र ज्या टीमसाठी आपण इतके वर्ष खेळतो त्या टीमकडून मिळालेल्या अपमानजनक वागणूकीमुळे खेळाडूने टोकाचं पाऊल उचलत निवृत्तीचा निर्णय घेतला.
मुंबई | कोरोनानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधाशिवाय आयपीएलच्या 16 व्या मोसमाचं आयोजन करण्यात येत आहे. या 16 व्या पर्वाला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. मोसमातील सलामीचा सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्याआधी एकूण 10 संघ हे आयपीएलच्या या मोसमासाठी तयारीला लागले आहेत. एका ट्रॉफीसाठी 10 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. मात्र त्याआधी आम्ही तुम्हाला एका दिग्गज खेळाडूाबाबत सांगतो आहोत, ज्याने वयाच्या 31 व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या निमित्ताने या खेळाडूने समालोचकाचीही भूमिका बजावली. दुर्देवी म्हणजे खेळाडूचा अंत हा मुंबईत कॉमेंट्री करताना हृदयविकाराच्या धक्क्याने झाला.
आपण अशा खेळाडूबाबत असा किस्सा जाणून घेणार आहोत, ज्याच्या बॅटिंगचे चाहते दिवाने होते. या फलंदाजाने आक्रमकपणे कसोटी क्रिकेटमध्ये 46.55 च्या सरासरीने 3 हजार 631 धावा केल्या. तसेच वनडेत या क्रिकेटरने 44.61 च्या सरासरीने 6 हजार 68 रन्स केल्या. यामध्ये त्याने 7 शतकं आणि 46 अर्धशतकं ठोकली होती. तसेच वनडेच्या सार्वकालिक आयसीसी रँकिंगमध्ये 5 व्या क्रमांकावर होता.
कॉमेंट्रीदरम्यान हृदयविकाराचा धक्का
आपण ज्या क्रिकेटरबाबत बोलतोय ते दुसरे तिसरे कोणी नसून ऑस्ट्रेलियाचे डीन जोन्स आहे. डीन जोन्स यांची ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांमध्ये गणना केली जाते. डीन जोन्स यांनी जितकं क्रिकेटच्या मैदानात नाव कमावलं तितकंच एक समालोचक म्हणूनही प्रतिष्ठा मिळवली. डीन जोन्स यांना 2020 साली हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते कॉमेंट्री करत होते. डीन जोन्स यांनी वयाच्या 59 वर्षी जगाचा निरोप घेतला.
वयाच्या 31 व्या वर्षी निवृत्ती
डीन जोन्स यांच्या कसोटी करिअरचा अंत फार दुर्देवी राहिला. डीन जोन्स यांना 1992-93 साली टीममधून वादग्रस्तरित्या बाहेर काढण्यात आलं. यामुळे डीन जोन्स यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. तेव्हा जोन्स हे 31 वर्षांचे होते. जोन्स यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीतील अखेरचा सामना हा 1992 साली श्रीलंका विरुद्ध खेळले होते. तसेच जोन्स हे अखेरचा वनडे सामना हा 1994 साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळले होते.