Kl Rahl : अथिया शेट्टी हिच्या अहोंनी 103 मीटरच्या सिक्स मारल्यावर तिचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओ तुफान व्हायरल
राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर राहुलची पत्नी अथिया शेट्टी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेमकं या व्हिडीओमध्ये असं आहे तरी काय?
मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाचा 10 धावांनी पराभव झालेला आहे. सामन्यामध्ये लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल याने 39 धावांची महत्त्वाची खेळी केली. या सामन्यानंतर राहुलची पत्नी अथिया शेट्टी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेमकं या व्हिडीओमध्ये असं आहे तरी काय?
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
राहुल याने सलामीला येत मेयर्ससोबत एक चांगली सुरूवात करून दिली होती. राहुल आणि मेयर्स दोघांनी 82 धावांची मजबूत सलामी केली. राहुलने 39 धावा केल्या आणि यामध्ये त्याने 4 चौकार आणि 1 षटकार खेचला. हा षटकार तब्बल 103 मीटर इतका होता. युजवेंद्र चहल याला राहुलने हा गगनचुंबी षटकार मारला.
पाहा व्हिडीओ
????? ???? ??? – ???? ???? ???! ?
Continue streaming #RRvLSG, LIVE & FREE on #JioCinema only!#IPLonJioCinema #TATAIPL | @klrahul pic.twitter.com/CdghB6fza6
— JioCinema (@JioCinema) April 19, 2023
राहुलने षटकार मारल्यावर स्टेडियममध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचा आनंद गगनात मावत नव्हता. राहुलच्या शानदार सिक्सवर ती टाळ्या वाजवताना दिसली. अथियाची रिअॅक्शन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाचा 11 धावांनी पराभव झाला. लखनऊने दिलेल्या 154 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना राजस्थान संघाला निर्धारित 20 षटकात 144 धावाच करता आल्या. चांगल्या सुरूवातीनंतरही राजस्थान संघाला विजय मिळवता आला नाही.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई