IPL 2021 : VIDEO वाईडच्या आशेने बॉल सोडला, चेंडू थेट स्टम्प्समध्ये घुसला

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Kolkata Knight Riders Vs Chennai Super Kings) यांच्यात रोमांचक सामना झाला.

IPL 2021 : VIDEO वाईडच्या आशेने बॉल सोडला, चेंडू थेट स्टम्प्समध्ये घुसला
CSK vs KKR
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 11:23 AM

IPL 2021 KKR Vs CSK : आयपीएलमध्ये (IPL) काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Kolkata Knight Riders Vs Chennai Super Kings) यांच्यात रोमांचक सामना झाला. फाफ डुप्लेसीची (Faf Du Plessis) धडाकेबाज फलंदाजी आणि दीपक चहरची (Deepak Chahar)भेदक गोलंदाजी, त्यामुळे चेन्नईने (CSK) कोलकात्याला (KKR) 18 धावांनी मात दिली. महत्त्वाचं म्हणजे KKR च्या अवघ्या 31 धावात निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आंद्रे रसेलने (Andre Russell) धमाका केला.

रसेलने 22 चेंडूत 54 धावांची झंझावाती फलंदाजी केली. मात्र चेन्नईच्या सॅम करनने (Sam Curran) चकवा देऊन त्याला क्लीन बोल्ड केलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहे.

सॅम करणने सामना फिरवला

चेन्नईने कोलकात्यासमोर तब्बल 221 धावांचं लक्ष्य उभा केलं होतं. केकेआरने 11 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 115 धावा केल्या होत्या. त्यावेळी मैदानात आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक होते. दोघांची तुफानी फलंदाजी पाहता, हा सामना कोलकाता जिंकेल अशी परिस्थिती होती. त्याचवेळी धोनीने सॅम करणच्या हाती चेंडू सोपवला. त्याने रसेलला लेगवर गोलंदाजी केली. त्यावर रसेल गोंधळला. त्याला वाटलं बॉल वाईड जाईल. पण बॉल हलका स्विंग झाला आणि थेट स्टम्प्सवर लागला. त्यामुळे सॅम करणने एकच जल्लोष केला.

VIDEO : पाहा व्हिडीओ

चेन्नईची जबरदस्त बॅटिंग

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने डुप्लेसीच्या नाबाद 95 आणि ऋतुराज गायकवाडच्या 64 धावांच्या जोरावर 220 धावांचा डोंगर उभा केला होता. कोलकाताकडून पॅट कमिन्सने 34 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 66 धावा केल्या. तर आंद्रे रसलने 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 54 धावांचा पाऊस पाडला. याशिवाय दिनेश कार्तिकने 24 चेंडूत 40 धावा करुन, केकेआरला टार्गेटच्या दिशेने नेलं. मात्र कोलकात्याला 19.1 षटकात 202 धावाच करता आल्या.

संबंधित बातम्या 

KKR vs CSK, IPL 2021 Match 15 Result | पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलची झुंजार खेळी, चेन्नईचा 18 धावांनी विजय

PBKS vs SRH, IPL 2021 Match 14 Result | आधी टिच्चून गोलंदाजी, मग बेअरस्टोचं अर्धशतक, हैदराबादचा पंजाबवर शानदार विजय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.