IPL Media Rights : आयपीएलच्या प्रत्येक बॉलची किंमत 50 लाख? BCCI, खेळाडू, टीमची दिवाळी, बॉर्डकास्टर्सचं दिवाळं? हर्ष गोयंकांचा सवाल
याच लिलावाचे विश्लेषण हर्ष गोयंका यांनी त्यांच्या स्टाईलने केले आहे. तसेच या लिलावात खेळाडू पैसा कमावतील, बीसीसीआय पैसा कमवेल, टीम पैसा कमवतील, मात्र ब्रॉडकास्टर्स हाती काय लागलं? असाही सवाल त्यांनी केला आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मीडिया हक्कांचा लिलाव (IPL Media Rights) अलिकडेच पार पडला आहे. बीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी संध्याकाळी जाहीर केले की IPL 2023-27 साठीचे टीव्ही हक्क स्टारकडे (Star) तर डिजिटल राइट्स वायाकॉम (रिलायन्स) कडे असतील. पाच वर्षांसाठी एकूण चार पॅकेजेसची बोली सुमारे 50 हजार कोटी रुपयांवर (48,390 कोटी) पोहोचली आहे. आत्ता हा आकडा बघितल्यावर सर्वसान्यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहत नाहीत. मात्र आता याच लिलावाचे विश्लेषण हर्ष गोयंका यांनी त्यांच्या स्टाईलने केले आहे. तसेच या लिलावात खेळाडू पैसा कमावतील, बीसीसीआय पैसा कमवेल, टीम पैसा कमवतील, मात्र ब्रॉडकास्टर्स हाती काय लागलं? असाही सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या आकडेवारीचे विश्लेषण पाहिल्यास आयपीएलमध्ये फक्त धावांचा पाऊस पडत नाही तर पैशांचाही पाऊस पडतो, हीही तुमच्या सहज लक्षात येईल.
हर्ष गोयंका यांचं ट्विट
IPL AUCTION Total matches – 410 Balls per match – 240
TOTAL BROADCASTING RIGHTS – Rs 48390 cr
Total balls bowled – 98400
EACH BALL WORTH – Rs50 lakhs!!!!
BCCI will make money, Players will make money, Teams will make money, Broadcasters ??????
— Harsh Goenka (@hvgoenka) June 15, 2022
हर्ष गोयंका यांच्या ट्विटचा अर्थ काय?
हर्ष गोयंका यांनी ट्विट करत लिहिले आहे की….
आयपीएल लिलाव एकूण सामने – 410 चेंडू प्रति सामना – 240
एकूण प्रसारण अधिकार – रु 48390 कोटी
एकूण टाकलेले चेंडू – 98400
प्रत्येक बॉलची किंमत – रु 50 लाख!!!!
बीसीसीआय पैसे कमवेल खेळाडू पैसे कमावतील, संघ पैसे कमावतील, प्रसारक ??????
असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. आपल्या देशात क्रिकेट म्हणजे एका संस्कृतीसारखं पाहिलं जातं. त्यामुळे जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल भारतातच तयार झाली. जगातील इतर लीगपेक्षा सर्वात जास्त पैसा हा आयपीएलमध्ये लागतो. म्हणूनच जगभरातील खेळाडू भारतात आयपीएल खेळण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी येतात. मात्र प्रत्यक्षात हा पैशांचा खेळ उलगडून पाहिल्यावर खरं गणित लक्षात येतं. आता या पॅकेजचं विभाजन कसं झालंय त्यावरही एक नजर टाकू…
IPL 2023-27 मीडिया राईटस एकूण बोली – 48390 कोटी
- पॅकेज A (भारतातील टीव्ही हक्क) – 23575 कोटी, स्टार
- पॅकेज बी (भारतातील डिजिटल अधिकार) – 20500 कोटी, वायाकॉम-18
- पॅकेज C (भारतातील विशेष 18 सामने) – 3258 कोटी, वायाकॉम-18
- पॅकेज डी (परदेशात हक्क) – 1057 कोटी, वायाकॉम-18 आणि टाइम्स इंटरनेट