IPL Media Rights auction live updates : स्टार इंडिया, वायकॉम 18 आणि टाइम्स इंटरनेटने जिंकले मीडिया राइट्स, 48,390 कोटींना विक्री
IPL Media Rights Auction Day 3 live updates: टीवी आणि डिजिटल राइट्सच्या लढाईचा शेवट काय असेल? समोर आली एक मोठी अपडेट
आयपीएलच्या पुढील पाच हंगामातील 410 सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी बोली प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या दिवसाचा लिलाव संपला असून आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या आणि चौथ्या गटाच्या माध्यम हक्कांसाठी अद्याप बोली सुरू आहे. बीसीसीआयनं मीडियाचे हक्क चार गटांमध्ये विकण्याचा निर्णय घेतलाय . तिसऱ्या पॅकेजमध्ये एकूण 98 सामने असून एका सामन्यासाठी आतापर्यंत 18.5 कोटींची बोली लागली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या गटासाठी आज सकाळी 11 वाजता बोली सुरू होईल. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दोन पॅकेजची बोली पूर्ण झालीय. आतापर्यंत भारतात टीव्ही आणि डिजिटल अधिकारांचा लिलाव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या दोन श्रेणींचे हक्क 44,075 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. आज काय होतं ते पाहणं महत्वाचं असेल…
LIVE NEWS & UPDATES
-
आयपीएल मीडिया राईटची चुरस वाढली
स्टार इंडियाने घेतले 23,575 कोटींना टीव्ही हक्क
-
कोणी कुठलं पॅकेज जिंकलं
पॅकेज ए (डिज्नी स्टार), पॅकेज बी (वायकॉम 18), पॅकेज सी (वायकॉम 18) पॅकेज डी (अजून बाकी आहे)
-
-
पॅकेज A+B+C = 47,332.52 कोटी
पॅकेज ए 23,575 कोटी (प्रति सामना 57.50 कोटी, एकूण 410 मॅच), पॅकेज बी डिजिटल राइट्स 20,500 कोटी (प्रति मॅच 50 कोटी, एकूण 410 मॅच), पॅकेज सी प्रति सामना 3,257.52 कोटी, (प्रति मॅच 33.24 कोटी एकूण 98 सामने)
-
पॅकेज सी मध्ये एकूण पाच सीजनचे 98 सामने
पॅकेज सी मध्ये एकूण पाच सीजनचे 98 सामने आहेत. त्याच एकूण मुल्य 3752.52 कोटी रुपये आहे.
-
पॅकेज C साठी घमासान, डिज्नी-वायकॉम मध्ये कांटे की टक्कर
-
-
आज अयोध्यात भव्य राम मंदिर तयार होत आहे
– आज अयोध्यात भव्य राम मंदिर तयार होत आहे
– देशात तिर्थस्थळ आणि देवस्थानच्या विकास केला जातोय
– देशात नदी आणि पर्यावरण वाचवण्याचं काम केलं,
– आज देशात योगाची धूम आहे ती आपल्या संतांची देण आहे
– योगदिन मोठ्या उत्साहात साजरा
-
मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण
मोदींनी घेतलं तुकोबांचं दर्शन
सभा मंडपामध्ये उत्सुकता
मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण
-
बोली 50 हजार कोटींच्या जवळपास जाण्याची शक्यता
Media Rightsचं सध्याचं मूल्य आधीच 46 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेलंय
पॅकेज ‘सी’ची बोली 50 हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे
-
ब्रिटनमधील एकाही ब्रॉडकास्टरनं बोली लावली नाही
ब्रिटनमधील भारतीय क्रिकेट दर्शकांची संख्या जास्त आहे
हाच मुद्दा लक्षात घेऊन एक महत्वाची बाब समोर आली आहे
ब्रिटनमधील एकाही ब्रॉडकास्टरने पॅकेज’ डी’साठी बोली लावली नाही
-
सकाळी 11 वाजेपासून बोली सुरू
तिसऱ्या आणि चौथ्या गटासाठी आज सकाळी 11 वाजेपासून बोली सुरू
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दोन पॅकेजची बोली पूर्ण झालीय
-
दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान मोदींचं देहूत पोहोचतील
दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान मोदींचं देहूत पोहोचतील
देहूतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन
दुपारी दोन वाजता वारकऱ्यांना संबोधित करणार
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
अनेक मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे
-
पिंपरी चिंचवडमधले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पिंपरी पोलिसांनी घेतलं ताब्यात
पिंपरी चिंचवडमधले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पिंपरी पोलिसांनी घेतलं ताब्यात
आज मोदी पुण्यात येत असल्याने कडक पोलिस बंदोबस्त
विशेष म्हणजे आंदोलन रोखण्यासाठी कार्यकर्त्यांची धरपकड
-
आज तिसरा दिवस
आयपीएलच्या पुढील पाच हंगामातील 410 सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी बोली प्रक्रिया सुरू आहे
दुसऱ्या दिवसाचा लिलाव संपला
आज तिसरा दिवस
तिसऱ्या आणि चौथ्या गटाच्या माध्यम हक्कांसाठी अद्याप बोली सुरू आहे
बीसीसीआयनं मीडियाचे हक्क चार गटांमध्ये विकण्याचा निर्णय घेतलाय
तिसऱ्या पॅकेजमध्ये एकूण 98 सामने असून एका सामन्यासाठी आतापर्यंत 18.5 कोटींची बोली लागली आहे
तिसऱ्या आणि चौथ्या गटासाठी आज सकाळी 11 वाजता बोली सुरू होईल
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दोन पॅकेजची बोली पूर्ण झालीय
आतापर्यंत भारतात टीव्ही आणि डिजिटल अधिकारांचा लिलाव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे
या दोन श्रेणींचे हक्क 44,075 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. आज काय होतं ते पाहणं महत्वाचं असेल..
-
2017 मध्ये काय झालं?
सप्टेंबर 2017 मध्ये Star Indiaने 16 हजार 347.50 कोटी रुपयांची बोली लावली
2017 ते 2022 या कालावधीसाठी मीडिया हक्क विकत घेतले होते
त्यांनी सोनी पिक्चर्सचा पराभव केला
या करारानंतर आयपीएल सामन्याची किंमत जवळपास 55 कोटी रुपयांवर गेली होती
2008 मध्ये, सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने 8,200 कोटी रुपयांच्या बोलीवर 10 वर्षांसाठी मीडिया हक्क जिंकले.
-
बीसीसीआयला फायदाच फायदा
बीसीसीआयला फायदाच फायदा
- 410 सामने 5 वर्षात होऊ शकतात
- 16 हजार कोटींची बोली यापूर्वी लावली आहे
- 2008 मध्ये पहिल्यांदाच आयपीएलच्या प्रसारण हक्कतून बीसीसीआयला 8200 कोटी मिळाले होते
- तेव्हा ही दहा वर्षांसाठी बोली होती
- 2017 ते 2022 या कालावधीसाठी 16347 कोटी रुपये मिळाले होते.
- आता गेल्या वेळेपेक्षा ही बोली जवळपास तिप्पट होऊ शकते.
-
मीडिया अधिकारांचा इतिहास काय आहे?
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले
सोनीने प्रथम त्याच्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले
2008 ते 2017 पर्यंत 8,200 कोटी रुपयांना मीडिया अधिकार मिळवले होते
तेव्हा ऑनलाइन प्रक्षेपण नव्हते
यानंतर बीसीसीआयने 2018 मध्ये मीडिया हक्कांसाठीचे अधिकार पुन्हा विकले
यावेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने सोनीचा पराभव केला.
-
BCCI वर अक्षरक्ष: पैशांचा पाऊस
टीवी राइट्सची प्रति मॅच 57.50 कोटी आणि डिजिटल राइट्सची प्रति मॅच 48 कोटी रुपयांना पुढच्या पाच वर्षांसाठी विक्री करण्यात आली आहे.
-
बेस प्राइस 32 हजार कोटी रुपये
पुढच्या पाच वर्षांसाठी IPL मीडिया राइट्सची चार पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे
त्यांची बेस प्राइस निर्धारित करण्यात आली होती
मीडिया राइट्सची बेस प्राइस 32 हजार कोटी रुपये होती
पॅकेज ए म्हणजे टीवी राइट्सची बेस प्राइस 49 कोटी रुपये होती
पॅकेज बी डिजिटल राइट्सची बेस प्राइस 33 कोटी रुपये होती
पॅकेज सी ची बेस प्राइस 11 कोटी आणि पॅकेज डी ची बेस प्राइस 3 कोटी रुपये होती.
-
डील 44 हजार कोटींच्या पुढे
-
मीडिया राइट्स डील 44 हजार कोटींच्या पुढे
IPL Media Rights साठी रविवारपासून लिलाव सुरु आहे
पहिल्यादिवशी पॅकेज ए आणि बी साठी म्हणजे टीवी आणि डिजिटल प्रसारणासाठी बोली लावली गेली
पहिल्याच दिवशी आकडा 43,000 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला होता
दुसऱ्यादिवशी 44 हजार कोटींच्या पुढे डील डन झाली
म्हणजे आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी मीडिया राइट्सची किंमत 107 कोटींच्या घरात गेली
या व्यवहारामुळे IPL जगातील दुसरी महागडी स्पोर्ट्स लीग बनली आहे.
-
पॅकेज सी साठीची डील 1813 कोटी डील?
डिज्नी स्टारने टीवी राइट्स 23,575 कोटी रुपयांमध्ये तर Viacom 18 ने डिजिटल राइट्स 20,500 कोटी रुपयांमध्ये मिळवले आहेत
44075 कोटी रुपयांमध्ये 2023 ते 2027 साठी IPL च्या टीवी आणि डिजिटल राइट्सची डील झाली आहे
एकूण 410 सामन्यासाठी एवढी मोठी रक्तकम मोजण्यात आली आहे
त्या शिवाय पॅकेज सी साठीची डील 1813 कोटी रुपयांमध्ये फायनल झाल्याची माहिती आहे
पॅकेज सी चा संबंध प्लेऑफ सामन्यांशी आहे, तेच पॅकेज डी ची डील अजून बाकी आहे.
-
डिजिटलसाठी ‘Viacom 18’ ने मारली बाजी
पुढच्या पाच वर्षांसाठी IPL च्या प्रसारण अधिकारासंदर्भात मोठी डील झाली
या डीलची रक्कम 44 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे
टीवी राइट्सचे अधिकार ‘डिज्नी स्टार’ ने (disney star) मिळवले आहेत
डिजिटल राइट्स ‘Viacom 18‘ ने मिळवलेत
अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही.
-
केज ‘ए’ची किंमत 23,275 कोटी रुपये
पुढच्या पाचवर्षांसाठी राइट्सचा हा लिलाव झाला
बीसीसीआयने (BCCI) 2023 ते 2027 साठी मीडिया राइट्स विकले आहेत
हा लिलाव पॅकेज ए आणि पॅकेज बी साठी झाला आहे
दोन वर्गातील एकूण रक्कम 43,255 कोटी रुपये आहे
पॅकेज ए ची किंमत 23,275 कोटी रुपये तर पॅकेज बी ची एकूण किंमत 19,680 कोटी रुपये आहे
पॅकेज ए भारतातील टीवी राइट्ससाठी आहे तर पॅकेज बी ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी आहे
यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे पॅकेज ए जिंकणारी कंपनी पॅकेज बी जिंकणाऱ्या कंपनीला एक कोटी रुपयाच्या अतिरिक्त रक्कमेसह चॅलेंज करु शकते.
-
दोन कंपन्यांना मिळाला अधिकार
डिजिटल राइट्स वायकॉम 18 म्हणजे रिलायन्सने मिळवले आहेत
अजून याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे
पॅकेज सी आणि डी चा लिलाव बाकी आहे
पॅकेज सी मध्ये प्लेऑफसह लीगच्या 18 सामन्यातील नॉन एक्सक्लूसिव राइट्स आहेत
पॅकेड डी मध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारण अधिकार आहेत
-
आज सकाळी 11 वाजता लिलाव
आयपीएलच्या पुढील पाच हंगामातील 410 सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी बोली प्रक्रिया
दुसऱ्या दिवसाचा लिलाव संपला असून आज तिसरा दिवस आहे.
आज सकाळी 11 वाजता बोली सुरू होईल.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दोन पॅकेजची बोली पूर्ण झालीय
भारतात टीव्ही आणि डिजिटल अधिकारांचा लिलाव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे
या दोन श्रेणींचे हक्क 44,075 कोटी रुपयांना विकले गेले आहेत
आज काय होतं ते पाहणं महत्वाचं असेल…
Published On - Jun 14,2022 7:27 AM