Ipl Mega Auction 2025 : सीएसकेमधील धोनीचा खास भिडू मुंबईच्या गोटात, 3 भारतीय खेळाडू मालामाल
IPL Auction 2025 Day 2: आयपीएल 2025 मेगा ऑक्शमधील दुसर्या दिवशी भारतीय खेळाडू मालामाल झाला आहेत. मुंबईने चेन्नईतील धोनीच्या खास माणसाला आपल्या गोटात घेतलंय.
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी 24 नोव्हेंबरला 10 संघांनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. या 10 संघांकडून 467 कोटी 95 लाख रुपये खर्च केले. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लागली. त्यापैकी 72 खेळाडू सोल्ड झाले. तर 12 खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही 25 नोव्हेंबरला खेळाडूंना आपल्या गोटात घेण्यासाठी चांगलीच चुरस आणि रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंवर अक्षरक्ष पैशांचा पाऊस पाडण्यात आला.
भुवनेश्वर कुमार याला आरसीबीने 10 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं. भुवनेश्वर व्यतिरिक्त इतर खेळाडूंची चांदी झाली. भुवी व्यतिरिक्त टीम इंडियाच्या 3 खेळाडूंना आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी मोठी रक्कम मिळाली. ते 3 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
दीपक चाहर
दीपक चाहर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी 2018 पासून ते 2024 पर्यंत खेळला. त्यानंतर चेन्नईने दीपकला रिलीज केलं. दीपक चेन्नईचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनी याचा खास भिडू आहे. त्यामुळे दीपककडे मुंबईचं आधीपासून लक्ष होतं. मेगा ऑक्शनमध्ये दीपकचं नाव घेण्यात आलं. मुंबईने दीपकसाठी 9 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. दीपकने आतापर्यंत आयपीएलमध्ये 58 विकेट्स घेतल्या आहेत.
धोनीचा भिडू मुंबईच्या गोटात
Deepak Chahar: From CSK to MI 😅
Sold for 9.25 cr!#IPLAuction2025 #ipl2025auction pic.twitter.com/Xosm5MYYcw
— Cricbuzz (@cricbuzz) November 25, 2024
मुकेश कुमार
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने गेल्या 2-3 वर्षात आपला दबदबा तयार केला आहे. मुकेशसाठी दिल्लीने राईट टु मॅच कार्डचा वापर करत 8 कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात घेतलं. मुकेशचा यासह 2.50 कोटींचा फायदा झाला. मुकेशला गेल्या हंगामापर्यंत 5.50 कोटी रुपये मिळत होत. मुकेशने आयपीएलमध्ये 20 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या आहेत.
आकाश दीप
आकाश दीप 2022 पर्यंत आरसीबीच्या ताफ्यात होता. आकाश दीप याने टीम इंडियाकडून या वर्षी पदार्पण केलं. आकाश दीपने मिळालेल्या संधीचा फायदा घेत आपली छाप सोडली आणि अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. आकाश दीपसाठी मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई आणि पंजाबमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र लखनऊ आकाश दीपला ताफ्यात घेण्यात यशस्वी ठरली. लखनऊने आकाश दीपसाठी 8 कोटी मोजले.