बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमाला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स या मोसमातील आपला सलामीचा सामना हा रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध 2 एप्रिल रोजी खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम आणि कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने 2013 पासून रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2022 पर्यंत एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. विशेष बाब म्हणजे रोहितनेच मुंबईला आपल्या कॅप्टन्सीत ही कामगिरी केली. मात्र मुंबईला 2013 पासून ते 2022 पर्यंत एकदाही एक गोष्ट जमलेली नाही. मुंबईवर हा डाग लागलेला आहे. त्यामुळे यंदा तरी ‘पलटण’ आरसीबी विरुद्धच्या सामन्यात हा डाग पुसणार का, असा सवाल क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
आयपीएलमध्ये 2013 पासून 2022 पर्यंत एकदाही मुंबई इंडियन्सला आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या मोसमातील आपला अखेरचा सलामीचा सामना हा 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जिंकला होता. मात्र त्यानंतर सलग 10 मोसमांमध्ये मुंबईची पराभवाने सुरुवात झाली आहे.
प्रत्येक मोसमातील सुरुवात ही विजयाने व्हावी, अशी इच्छा प्रत्येक संघाची असते. मात्र मुंबईला गेल्या 10 वर्षात मात्र विजयी सलामी देता आलेली नाही. त्यामुळे मुंबई यंदा आरसीबीवर विजय मिळवत आपल्यावर लागलेला डाग पुसणार काढणार का, याबाबत क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्सची मोसमनिहाय सलामी सामन्यातील कामगिरी
mumbai indians consecutively lost his opening match from ipl 2013 to 2022
2017 lost against RPS
2018 lost against csk
2019 lost against dc
2020 lost lost against csk
2021 lost against rcb
2022 lost against dc
2023 – ?#MI #MumbaiIndians #IPL2023 #Paltan #RohitSharma?— Sanjay Patil (@patil23697) April 2, 2023
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.
आरसीबी टीम | फॉफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, हिमांशु शर्मा, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर , मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, रीस टॉपले, मनोज वानखेडे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, आकाश वशिष्ठ आणि आकाश दीप।