IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुलची एन्ट्री, कोण कोणत्या स्थानावर ते वाचा
IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : आयपीएल 2024 स्पर्धेतील 34 सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने जबरदस्त फलंदाजी केली. यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उडी घेतली आहे.
आयपीएल स्पर्धेतील 34 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला. कर्णधार केएल राहुलने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी स्वीकारली. लखनौच्या गोलंदाजांनी साजेशी कामगिरी केली. 20 षटकात 6 गडी घेऊन चेन्नई सुपर किंग्सला 176 धावांवर रोखलं. विजयासाठी मिळालं 177 धावांचं आव्हान पाहता केएल राहुल आणि क्विंटन डीकॉक यांनी सावध सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 134 धावांची भागीदारी केली. यात क्विंटन डीकॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 1 षटकार मारला. तर कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 83 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टोइनिसने विजयी भागीदारी करून संघाला जिंकून दिलं. केएल राहुलने ठोकलेल्या 82 धावांमुळे ऑरेंज कॅपची शर्यत रंगतदार झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहलीचं ऑरेंज कॅपमधील स्थान अबाधित आहे. विराट कोहलीने 7 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग असून त्याने 7 सामन्यात 318 धावा केल्या. तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा असून 297 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध चमकदार कामगिरी करून केएल राहुलने टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली आहे. केएल राहुल चौथ्या स्थानी पोहोचला असून 7 सामन्यात 281 धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरीन असून त्याने 6 सामन्यात 276 धावा केल्या आहेत. टॉप 5 मध्ये एन्ट्री घेण्यासाठी संजू सॅमसन, शुबमन गिल, हेन्रिक क्लासेन आणि जोस बटलरही वेशीवर आहेत. आता पुढच्या सामन्यात ही शर्यत रंगतदार होणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.