IPL 2024 Orange Cap : साई सुदर्शनची एन्ट्री, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोरदार चुरस
IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन याची एन्ट्री झाली आहे.त्यामुळे आता चुरस वाढली आहे. पाहा कुणाच्या नावावर किती धावा?
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्या दोन्ही संघांच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. पहिल्या डावात शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी शतकी खेळी केली. शुबमन गिलने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत कारकीर्दीतील चौथं शतक ठोकलं. तर दुसऱ्या बाजूला 232 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड अपयशी ठरला. ऋतुराजला भोपळाही फोडता आला नाही. या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत काय बदल झालाय हे आपण जाणून घेऊयात.
ऋतुराज गायकवाड झिरोवर आऊट झाला. ऋतुराजला धावा करुन ऑरेंज कॅपचा मानकरी असलेल्या विराट कोहली याच्या आणखी जवळ जात आपलं दुसरं स्थान भक्कम करण्याची संधी होती. मात्र ऋतुराजला खातंही उघडता आलं नाही. मात्र ऋतुराज त्यानंतरही दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी अनुक्रमे 104 आणि 103 अशा धावा केल्या. साई सुदर्शनने या खेळीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली. साई सुदर्शन चौथ्या स्थानी विराजमान झाला. त्यामुळे केकेआरचा सुनील नरीन पहिल्या पाचातून बाहेर फेकला गेला आहे. पहिल्या 5 फलंदाजांमध्ये हा या सामन्यानंतर एकच बदल झाला आहे.
साई सुदर्शन याच्या नावावर 12 सामन्यांमध्ये 527 धावा आहेत. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन 471 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या टेव्हिस हेड याने 11 सामन्यात 533 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नावावर 12 सामन्यांमध्ये 541 रन्स आहेत. तर ऑरेंज कॅपचा मानकरी विराट कोहली याने 12 सामन्यात सर्वाधिक 634 धावा केल्या आहेत.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा आणि कार्तिक त्यागी.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग.