IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये हा खेळाडू आघाडीवर, जाणून घ्या कोण कोण आहेत दावेदार
IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यानंतरही काही फरक पडलेला नाही. ऑरेंज कॅप विराट कोहलीकडेच आहे. टॉप 5 खेळाडूमध्ये कोणी एन्ट्री मारली ते जाणून घेऊयात.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने 4 गडी आणि 4 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 गडी गमवून 144 धावा केल्या आणि विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 6 गडी गमवून 19.2 षटकात पूर्ण केलं आहे. या सामन्यातील विजयासह लखनौ सुपर जायंट्सने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. पाचव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून नेहल वढेराने 41 चेंडूत 46 धावा केल्या. तर लखनौ सुपर जायंट्सकडून मार्कस स्टोयनिसने 45 चेंडूत 62 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे ऑरेंज कॅपच्या गुणतालिकेत फारसा काही फरक पडला नाही. केएल राहुलने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली आणि टॉप 5 मध्ये एन्ट्री घेतली आहे.
विराट कोहलीने 10 सामन्यात 500 धावांचा टप्पा गाठत पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. त्याने 9 सामन्यात 149.49 च्या स्ट्राईक रेटने 447 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 418 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर केएल राहुलने 10 सामन्यात 406 धावा करत चौथं स्थान गाठलं आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत 398 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. ऑरेंज कॅपची गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी आहे. पुढच्या सामन्यात विराट कोहलीने आणखी काही धावा केल्या तर हा मान त्याच्याकडेच राहील.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.