IPL 2024 Orange Cap: आयपीएल ऑरेंज कॅपची शर्यतीत रंगत, संजू सॅमसन आणि केएल राहुलची आता उडी
IPL 2024 Purple Cap, Highest run scorer : आयपीएल 2024 स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामने पार पडले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पडला. या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर गुणतालिकेवर परिणाम झाला आहे. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही उलथापालथ झाली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गेल्या काही दिवसांपासून एकच नाव कायम आहे. रनमशिन्स म्हणून ख्याती असलेला विराट कोहलीचं ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील नाव अद्याप कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑरेंज कॅपचा मान त्याच्याकडेच आहे. त्याच्या आसपास कोणी आलं की विराट कोहली दुसऱ्या सामन्यात त्यामधील अंतर आणखी वाढवतो. त्यामुळे विराट कोहलीला गाठणं आता वाटतं तितकं सोपं नाही. रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यातील कामगिरीनंतर ऑरेंज कॅपची शर्यत येत्या काही दिवसात चुरशीची होणार आहे यात काही शंका नाही. विराट कोहली 9 सामन्यात 430 धावा करत अव्वल स्थानी आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन 9 सामन्यात 385 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानात 45 धावांचं अंतर आहे. तिसऱ्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आहे. त्याच्या नावावर 9 सामन्यात 378 धावा आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत 371 धावांसह चौथ्या आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरीन 8 सामन्यात 357 धावांसह पाचव्या स्थानी आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 44 वा सामना रंगला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावा दिल्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 19 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात केएल राहुलने 48 चेंडूत 76 धावा, तर संजू सॅमसनने 33 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर कर्णधार), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर