IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रियान परागची एन्ट्री, कोण कुठे ते वाचा
IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : आयपीएल 2024 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरु आहे. आता ऑरेंज कॅपची शर्यत प्लेऑफप्रमाणे रंगतदार वळणावर आली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या खुर्चीवर विराट कोहली बसला आहे. दुसरीकडे, टॉप 5 मध्ये रियान परागने एन्ट्री मारली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत सुरुवातीचा ट्रेंड पाहिला तर प्लेऑफमध्ये असं काही होईल याची कल्पना केली जात नव्हती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिला सामना गमवला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर सलग सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. त्यानंतर सलग पाच सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या शर्यतीत एन्ट्री घेतली आहे. आता साखळी फेरीतील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत होणार आहे. या स्पर्धेची सुरुवातच या दोन संघांच्या सामन्यापासून झाली होती. आता प्लेऑफसाठी या दोन संघांमध्ये महत्त्वाची लढत होणार आहे. असं सर्व प्लेऑफचं गणित मांडलं जात असताना ऑरेंज कॅपची शर्यतही रंगतदार वळणावर आली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा रनमशिन्स विराट कोहली या स्थानावर विराजमान आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळालं, तर विराट कोहलीला पकडणं खूपच कठीण होईल. दुसरीकडे, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने एन्ट्री मारली आहे. पंजाब किंग्सविरुद्ध अर्धशतक हुकलं असलं तरी टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे.
रियान परागने 34 चेंडूत 48 धावांची खेळी केली. यात त्याने 6 चौकार मारले. या धावांसह रियान परागने टॉप 5 मध्ये एन्ट्री घेतली आहे. रियान परागने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने 13 पैकी 12 सामन्यात फलंदाजी केली आणि 531 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 13 सामन्यात 5 अर्धशतकं आणि 1 शतकाच्या जोरावर 661 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 13सामन्यात 583 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबदचा ट्रेव्हिस हेड आहे. त्याने 11 सामन्यात 533 धावा केल्या आहे. विराट कोहलीला गाठण्यासाठी शतक ठोकावं लागेल. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन पाचव्या स्थानावर आहे. त्याने 12 सामन्यात 527 धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.