IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर कोण?
IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 18 सामन्यानंतर ऑरेँज कॅपचा मानकरी कोण? पहिल्या पाचात अनकॅप्ड फलंदाजाची एन्ट्री.
चेन्नई सुपर किंग्सला धुळ चारत सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग दुसरा विजय मिळवला. आपला चौथा सामना खेळत असलेल्या हैदराबादने चेन्नईवर 6 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने हे आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. हैदराबादने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावरुन थेट पाचव्या स्थानी झेप घेतली.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 166 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या अभिषेक शर्मा याने झंझावाती सुरुवात करुन दिली. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 2.4 ओव्हरमध्ये 46 धावांची खेळी केली.त्यानंतर अभिषेक आऊट झाला. अभिषेकने 12 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 308.33 च्या स्ट्राईक रेटने 37 धावांची खेळी केली. अभिषेकला या खेळीचा जबरदस्त फायदा झाला.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप 5 फलंदाज
Abhishek Sharma moves to fifth place in the Orange Cap list ✅ Mohit Sharma continues to lead the Purple Cap list ✅#ViratKohli #AbhishekSharma #ViratKohli #SRHvsCSK #SRHvCSK #IPL #IPL2024 #Cricket #SBM pic.twitter.com/bBWERjnISc
— SBM Cricket (@Sbettingmarkets) April 5, 2024
अभिषेक या खेळीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आला आहे. अभिषेकने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गुजरातच्या साई सुदर्शन याला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहचला आहे. तर पहिल्या 4 स्थानात कोणताही बदल झालेला नाही. विराट कोहली याच्याकडे ऑरेँज कॅप कायम आहे. मात्र तिसऱ्या स्थानी असलेल्या हैदराबादच्या हेन्रिक क्लासेन याच्या धावांमध्ये वाढ झाली आहे. हेन्रिकने चेन्नई विरुद्ध हैदराबादसाठी नाबाद 10 धावांची खेळी केली. हेन्रिकने यासह आपलं स्थान आणखी भक्कम केलंय.
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.