IPL 2023 Points Table | हाय व्होल्टेज सामन्यात आरसीबीने विजय मिळवल्यावर पॉइंट टेबल्समध्ये मोठा उलटफेर, जाणून घ्या!
IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : या सामन्यामध्ये आरसीबी संघाने 18 धावांनी विजय मिळवला आहे. हाय व्होल्टेज सामन्यामधील विजयानंतर आरसीबीने पॉइंट टेबलमध्ये 2 गुण मिळवले आहेत.
मुंबई : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना पार पडला आहे. या सामन्यामध्ये आरसीबी संघाने 18 धावांनी विजय मिळवला आहे. हाय व्होल्टेज सामन्यामधील विजयानंतर आरसीबीने पॉइंट टेबलमध्ये 2 गुण मिळवले आहेत. या गुणांसह आरसीबी संघाने एकूण दहा गुणांसह आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
पहिल्या स्थानी गुजरात टायटन्स 12 गुण (+.638) झाले आहेत. दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सदहा गुणांसह (+0.800) आहे. तिसऱ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्स 10 गुणांसह (+0.639) आणि चौथ्या स्थानी 10 गुणांसह सीएसके (-0.329) पाचव्या स्थानी आरसीबी 10 गुणांसह (-0.030), सहाव्या स्थानी पंजाब किंग्ज 10 गुणांसह (-0.447) आहे.
सामन्याचा धावता आढावा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने लो स्कोअरिंग सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 18 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. आरसीबीने लखनऊला विजयासाठी 127 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आरसीबीच्या भेदक माऱ्यासमोर लखनऊला ऑलआऊट 108 धावाच करता आल्या. आरसीबीने शानदार पद्धतीने निच्चांकी धावसंख्येचं हुशारीने बचाव केला. आरसीबीचे सर्वच गोलंदाज आणि टीम या विजयाचे हिरो ठरले.
आजच्या सामन्यामध्ये विराट-गंभीरमध्ये बाचा-बाची
सामना झाल्यावर स्टार खेळाडू विराट कोहली आणि लखनऊ संघाचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यामध्ये भर मैदानात गरमा गरमी झालेली दिसली.
Only reason I pay my WiFi bill ??#ViratKohli #LSGvsRCB #Gambhir #Naveen pic.twitter.com/Bxkv46vNdl
— Soham (@Soham_1610) May 1, 2023
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.