IPL 2023 Points Table | अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवत मारली मुसंडी, मोठा बदल
IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : दिल्लीने आणखी दोन गुणांची कमाई करत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलंय. या सामन्यानंतर पाहा पॉइंट टेबलमध्ये काय बदल झालेत.
मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवला आहे. या विजयासह दिल्लीने आणखी दोन गुणांची कमाई करत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलंय. या सामन्यानंतर पाहा पॉइंट टेबलमध्ये काय बदल झालेत.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
पॉइंट टेबलमध्ये फार काही बदल झाला नाही. एक नंबरला असलेला गुजरात टायटन्स संघ आहे त्या स्थानावरच आहे. आजच्या पराभवामुळे गुजरातला जास्त काही फटका बसला नाही. फक्त त्यांचे 14 गुण होता होता राहिले. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाने 6 गुण मिळवत आपलं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना गुजरातला 131 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मोहम्मद शमीच्या वेगवान गोलंदाजीसमोर सर्वांनी शरणागती पत्करली. गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक म्हणजेच 4 गडी बाद केले. राशीद खानने एक तर मोहित शर्माने दोन गडी बाद केले.
गुजरातच्या महत्त्वाच्या फलंदाजांनी आपल्या विकेट सोडल्या, कोणतीही मोठी भागीदारी पाहायला मिळाली नाही. शेवटच्या षटकात 12 धावा आवश्यक असताना पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा आल्या. त्यानंतर तिसरा चेंडू इशांत शर्माने निर्धाव टाकला. चौथ्या चेंडूवर आक्रमक खेळणारा तेवतिया बाद झाला आणि सामन्यात रंगत आली. दोन चेंडू 9 धावा आवश्यक असताना राशिद खान आला आणि दोन धावा घेतल्या. शेवटचा चेंडूवर 7 धावा आवश्यक असताना फक्त दोन धावा घेता आल्या. शेवटी सामना दिल्लीने आपल्या खिशात घातला.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिली रोसो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा.