IPL 2023 Points Table | केकेआरच्या विजयानंतर पॉइंट टेबल ‘जैसे थे’, फक्त… पाहा कोण आहे टॉपर?

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : केकेआर संघाने आजच्या विजयासह दोन गुणांची कमाई केली. मात्र ते पॉइंट टेबल मध्ये आहे त्याच स्थानावर आहेत. केकेआरचे आता 8 गुण झाले असून ते पॉइंट टेबल्स मध्ये आठव्या स्थानावर आहेत.

IPL 2023 Points Table | केकेआरच्या विजयानंतर पॉइंट टेबल 'जैसे थे', फक्त... पाहा कोण आहे टॉपर?
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 12:41 AM

मुंबई : सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने पाच धावांनी विजय मिळवलेला आहे. या अटीतटीच्या सामन्यात केकेआरचा पराभव होईल असं सर्वांना वाटत होतं कारण हैदराबाद संघ मजबूत स्थितीत होता. मात्र बॉलरने केलेल्या कमाल कामगिरीच्या जोरावर हा सामना केकेआरने आपल्या पारड्यात झुकवला. आजच्या विजयासह केकेआर संघाने 2 गुणांची कमाई केली आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

केकेआर संघाने आजच्या विजयासह दोन गुणांची कमाई केली. मात्र ते पॉइंट टेबल मध्ये आहे त्याच स्थानावर आहेत. केकेआरचे आता 8 गुण झाले असून ते पॉइंट टेबल्स मध्ये आठव्या स्थानावर आहेत. तर हैदराबाद संघ पराभव झाल्यामुळे 9 व्या स्थानावर कायम आहे.

सामन्याचा धावता आढावा

केकेआर संघाने प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघासमोर 172 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं. मात्र हैदराबाद संघाला 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. केकेआर संघाकडून रिंकू सिंग याने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तर त्यासोबतच नितिश राणाने सुद्धा 42 धावांची महत्त्वाची खेळी केली. तर शेवटला येत अनुकूल रॉय याने सात चेंडूंमध्ये 13 धावा करत संघाला 170 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

केकेआर संघाने दिलेल्या लक्ष्याच पाठलाग करताना हैदराबाद संघाने सावध सुरुवात केली होती. मात्र आज सुद्धा मयंक अग्रवाल अपयशी ठरला. त्यासोबतच अभिषेक शर्मा हा सुद्धा 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाकडून कर्णधार मारक्रमने 41 धावांची तर क्लासेसने 36 धावा करत संघाला विजयाच्या वाटेवर आणलं होतं.

दोघेही बाद झाल्यावर संघ कुठेतरी विजयापासून वंचित राहिला. कारण त्यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात आलं नाही. केकेआरचा स्पिनर वरून चक्रवर्तीने शेवटची ओव्हर टाकत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.