IPL Purple Cap : दिग्गजांना पछाडत भारतीय युवा बोलर्स अग्रस्थानी, बॅट्समनचा ठरतोय कर्दनकाळ!

स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बोलर्सला पर्पल कॅपने सन्मानित करण्यात येतं. सध्या बंगळुरुचा हर्षल पटेल सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बोलर्समध्ये अग्रस्थानी आहे. (IPL Points Table 2021 Standing Ranking purple Cap After KKR vs RR 24th April)

IPL Purple Cap : दिग्गजांना पछाडत भारतीय युवा बोलर्स अग्रस्थानी, बॅट्समनचा ठरतोय कर्दनकाळ!
Harshal Patel
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 6:36 AM

मुंबई :  आयपीएलच्या (IPL 2021) जवळपास 19 मॅचेस पार पडल्या आहेत. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या मॅचेसमध्ये प्रेक्षकांना खूपच रोमांच अनुभवायला मिळाला आहे. खासकरुन आयपीएलमध्ये बॅटसमनची सर्वाधिक चर्चा होते. त्याने मारलेल्या चौकार षटकारांवर सर्वाधिक चर्चा, गप्पा गोष्टी होतात. मात्र असं असलं तरी बोलर्स देखील आयपीएलमध्ये तितकीच महत्त्वाची भूमिका निभावतात. ज्या प्रकारे आपण सर्वाधिक रन्स करायला हवेत, असा प्रयत्न बॅट्समन करत असतात, त्याच प्रकारे आपणही स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या पाहिजेत, असा प्रयत्न बोलर्स करत असतात. स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बोलर्सला पर्पल कॅपने सन्मानित करण्यात येतं. आतापर्यंत झालेल्या (राजस्थान विरुद्ध कोलकाता मॅचच्या निकालापर्यंत) मॅचेसमध्ये सर्वाधिक विकेट्स कुणाच्या नावावर आहेत आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, याच्यावर आपण नजर टाकूया…! (IPL Points Table 2021 Standing Ranking purple Cap After KKR vs RR 24th April)

स्पर्धेत आतापर्यंत बऱ्याच घडामोडी बघायला मिळाल्या आहेत. सर्वोत्तम खेळी, शानदार बोलिंग, मॅच कोणत्याही क्षणी पलटण्याचा प्रसंग, एकाच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाकडे मॅच झुकण्याची स्थिती, हारलेली मॅच पुन्हा एखाद्या बोलर्समुळे परत आलेली, असे एक ना अनेक प्रसंग बोलर्सनी दाखवून दिले आहेत.

आतापर्यंत स्पर्धेत प्रत्येक संघांनी 4-4 मॅचेस खेळल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात शनिवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना रंगला. हा दोन्ही संघांचा पाचवा सामना होता. या सामन्यात राजस्थानने कोलकात्याला 6 विकेट्सने नमवलं. स्पर्धेत आतापर्यंत भारतीय बोलर्सचा बोलबाला राहिलेला आहे.

पर्पल कॅपची लिस्ट

1) हर्षल पटेल (रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु), 4 मॅच- 12 विकेट्स 2) राहुल चहर (मुंबई इंडियन्स), 5 मॅच- 9 विकेट्स 3)ख्रिस मॉरिस (राजस्थान रॉयल्स), 5 मॅच- 9 विकेट्स 4) दीपक चहर (चेन्नई सुपर किंग्ज) 4 मॅच-8 विकेट्स 5)आवेश खान (दिल्ली कॅपिटल्स)4 मॅच-8 विकेट्स

(IPL Points Table 2021 Standing Ranking purple Cap After KKR vs RR 24th April)

हे ही वाचा :

RR vs KKR, IPL 2021 Match 18 Result | कर्णधार संजू सॅमसनची नाबाद संयमी खेळी, राजस्थानचा कोलकातावर 6 विकेट्सने विजय

IPL 2021 | पंजाब विरुद्ध मुंबईचा दारुण पराभव, हिटमॅन रोहितच्या निर्णयावर सेहवाग संतापला, म्हणाला…

RR vs KKR, IPL Match Prediction | कोलकाता विरुद्धच्या लढतीआधी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन टेन्शन फ्री, वाचा नक्की कारण काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.