मुंबई: IPL 2022 स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली असताना मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाला सूर गवसला आहे. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने काल आपल्या लौकीकाला साजेसा खेळ केला. एका अटी-तटीच्या सामन्यात स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) पाच धावांनी नमवलं. सलग आठ सामने गमवाल्यानंतर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आता सूर गवसला आहे. मुंबई इंडियन्सचं यंदाच्या सीजनमधील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. आता फक्त त्यांना प्रतिष्ठा राखण्यासाठी सामने जिंकायचे आहेत. या अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचा काही फायदा होणार नसला, तरी ते इतर संघांचा खेळ मात्र नक्कीच बिघडवू शकतात. याची सुरुवात गुजरात टायटन्स विरुद्धच्या विजयाने झाली आहे. शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. यामुळे पॉइंटस टेबलमधील दोन्ही संघांच्या स्थितीवर काही फरक पडला नाही. पण गुजरातच्या सर्वातआधी प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या अपेक्षांना मात्र नक्कीच सुरुंग लावला.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर काल हा सामना झाला. त्याआधी गुजरात टायटन्सचे 10 पैकी आठ सामने जिंकून 16 पॉइंटस झाले आहेत. गुजरातच्या टीमने प्लेऑफमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. लीगमधले 14 सामने पूर्ण होण्याआधी ही टीम पहिल्या दोन संघांमध्ये असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या मात्र तसं होताना दिसत नाहीय. मागच्या काही सामन्यात गुजरातच्या टीमने शेवटच्या षटकात विजय मिळवला होता. पण काल त्यांचा शेवटच्या ओव्हरमध्येच पराभव झाला. पराभवाच्या तोंडातून विजय मिळवण्यात एक्सपर्ट असलेल्या मुंबई इंडियन्सने काल आपल्या जुन्या दिवसांची आठवण करुन दिली.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
पॉइंटस टेबलवर या मॅचचा काय परिणाम झाला, याचा विचार केल्यास, गुजरातची टीम अजूनही 16 पॉइंटससह पहिल्या स्थानावर आहे. चार पॉइंटससह मुंबईची टीम अजूनही तळालाच आहे. सलग दुसऱ्या पराभवामुळे अजूनही गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये प्रवेश पक्का करता आलेला नाही. त्याशिवाय त्यांचा रनरेटही थोडा कमी झालाय. याचा फायदा लखनौ सुपर जायंट्सला मिळू शकतो. त्यांनी गुजरातपेक्षा एका सामना कमी खेळलाय. 10 सामने खेळाडू लखनौचे 14 पॉइंटस आहेत. लखनौचा पुढचा सामना आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आहे. केएल राहुलच्या टीमने आजची मॅच जिंकली, तर ते चांगल्या रनरेटसह पहिल्या स्थानावर झेप घेऊ शकतात.