IPL 2023 Points Table | पॉइंट टेबलमध्ये सीएसकेचा थेट ‘टॉप गिअर’, यंदाच्या सीझचनचा पहिला संघ
IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : सीएसकेने पॉइंट टेबलमध्ये अग्रस्थान पटकावलेलं आहे. सीएसके हा यंदाच्या सीझनचा दहा अंक मिळवणारा पहिला संघ आहे.
मुंबई : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरूवात झाली असून आता पॉइंट टेबलमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्जने कोलकातावर विजय मिळवत थेच टॉप गिअर टाकलेला आहे. केकेआरवर सीएसकेने तब्बल 49 धावांनी मोठा विजय मिळवला आहे.
सीएसकेने पॉइंट टेबलमध्ये अग्रस्थान पटकावलेलं आहे. सीएसके हा यंदाच्या सीझनचा दहा अंक मिळवणारा पहिला संघ आहे. सीएसके दहा गुणांसह पहिल्या स्थानी तर त्या पाठोपाठ राजस्थान, लखनऊ, गुजरात, आरसीबी आणि पंजाब या संघाचेही 8 गुण आहेत. सर्व संघांना आपलं स्थान मजबूत करण्यासाठी रनरेटकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
पॉइंट टेबल मध्ये सातव्या स्थानी मुंबई इंडियन्स 6 गुणांसह आहे. तर आठव्या स्थानावर 4 गुणांसह केकेआरचा संघ, नवव्या स्थानी चार गुणांसहच हैदराबाद संघ आहे. शेवटलादोन गुणांसह दिल्ली कॅपिटल्स हा संघ आहे.
आजच्या सामन्याचा धावता आढावा
सीएसके संघाने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये अजिंक्य रहाणे नाबाद 71 धावा आणि शिवम दुबे 50 धावा आणि कॉनव्हे 56 धावा या तिघांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 235 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरला मात्र अपयश आलं. केकेआरची सुरुवात ही एकदम खराब झाली होती. रिंकू सिंग आणि जेसन रॉय यांना ओळखता इतर कोणालाही मोठी खेळी करता आलेली नाही. जेसन रॉयने अवघ्या 26 चेंडूत 61 धावा केल्या, यामध्ये त्याने पाच चौकार तर पाच षटकार मारले. तर रिंकू सिंगने 33 चेंडू 53 धावा केल्या. यामध्ये त्याने चार षटकार तर तीन चौकार मारले. मात्र तर इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही.