IPL 2023 Points Table | लखनऊने पंजाबला मोठ्या फरकाने हरवत गाठलं दुसरं स्थान, दिल्ली आणि हैदराबादचं गणित बिघडलं
आयपीएल 2023 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गणित बदलत आहे. सुपर 4 साठी जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. आता लखनऊने पंजाबला मोठ्या फरकाने हरवत दुसरं स्थान गाठलं आहे. चला जाणून घेऊयात इतर स्थिती
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने आता अंतिम फेरीच्या दिशेने कुच करत आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरत आहे. तळाशी असलेल्या संघांचं टॉपमधील संघांकडे लक्ष लागून आहे. कारण त्यांच्या पराभवामुळे चित्र एक झटक्यात बदलून जात आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 38 वा सामना पार पडला. या सामन्यात लखनऊने 5 गडी गमवून 257 धावा केल्या आणि पंजाबला 201 धावांवर रोखलं. या विजयासह लखनऊने दुसरं स्थान गाठलं आहे.
लखऊ सुपर जायंट्सने पंजाबला 56 धावांनी पराभूत केल्याने नेट रनरेटमध्ये फायदा झाला. यामुळे अव्वल स्थान गाठण्यास मदत आली. आता गुणतालिकेत लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी दहा गुणांसह टॉप 4 मध्ये आहेत.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
राजस्थान रॉयल्स 10 गुण आणि +0.939 रनरेटसह अव्वल, लखनऊ सुपर जायंट्स 10 गुण आणि +0.841 रनरेटसह दुसऱ्या, गुजरात टायटन्स 10 गुण आणि +0.580 रनरेटसह तिसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स 10 गुण आणि +0.376 रनरेटसह चौथ्या, आरसीबी 8 गुण आणि -0.139 रनरेटसह पाचव्या, पंजाब किंग्स 8 गुण आणि -0.510 रनरेटसह सहाव्या, कोलकाता 6 गुण आणि -0.027 रनरेटसह सातव्या, मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.6220 रनरेटसह आठव्या, हैदराबाद 4 गुण आणि -0.725 गुणांसह नवव्या आणि दिल्ली कॅपिटल्स 4 गुण आणि -0.961 रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स
पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र लखनऊच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करत हा निर्णय चुकीचा ठरवला. लखनऊने 20 षटकात 5 गडी गमवून 257 धावा केल्या आणि विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं. मात्र पंजाबचा संघ 20 षटकात सर्व गडी गमवून 201 धावा करू शकला. लखनऊचा पंजाबने 56 धावांनी पराभव केला.
दोन्ही संघाचे खेळाडू
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपर हुड्डा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, यश ठाकूर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि नवीन-उल-हक.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंग.