IPL 2023 Points Table | राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव तरीही अग्रस्थानी कायम, पॉइँट टेबलमध्ये उलटफेर
PL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap | लखनऊ संघाने बुधवारी झालेल्या सामन्यामध्ये विजय मिळवत दुसऱ्या स्थान मिळवलं आहे. रन रेटच्या आधारावर राजस्थान संघ अग्रस्थानी कायम आहे.
मुंबई : आयपीएल 16 व्या मोसमामध्ये 26 व्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून झालेल्या पराभवानंतरही पहिल्या क्रमांकांचं स्थान कायम ठेवलं आहे. लखनऊ संघाने बुधवारी झालेल्या सामन्यामध्ये विजय मिळवत दुसऱ्या स्थान मिळवलं आहे. रन रेटच्या आधारावर राजस्थान संघ अग्रस्थानी कायम आहे.
राजस्थान आणि लखनऊ दोन्ही संघांनी सहा सहा सामने खेळले असून त्यामध्ये चार सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव झालेला आहे. पॉइंट टेबल मध्ये तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ सहा गुणांसह अनुक्रमे आहेत.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
आजच्या सामन्यांमध्ये राजस्थान संघाला लखनऊ संघाने दिलेले लक्ष्य गाठता आलं नाही. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने 154 धावा केल्या होत्या, यामध्ये कायले मेयर्स याने सर्वाधिक 51 धावा, तर के एल राहुल याने 39 धावा केल्या होत्या. राजस्थान संघाकडून या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात एकदम झकास झाली होती. जोस बटलर आणि जयस्वाल यांनी 87 धावांची सलामी दिली होती. जयस्वाल बाद झाला आणि नियमित अंतराने राजस्थानचे गडी बाद होत गेले.
जयस्वालने 44 धावा तर जोस बटलरने 40 धावा केल्या होत्या. मात्र या दोघां व्यतिरिक्त राजस्थानच्या इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. याचाच फटका बसला आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊने राजस्थान संघावर 11 धावांनी पराभव विजय मिळवला.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई